शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नक्षलवाद्यांसाठी २०२४ घातक वर्ष, १८८ हून अधिक जणांचा खात्मा, सुरक्षा यंत्रणांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे नक्षलवादी कोंडीत

By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 23:59 IST

Naxalite Movement: २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे.

- योगेश पांडे  नागपूर - छत्तीसगडमधील नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ३० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. २०२४ हे तेथील नक्षलवाद्यांसाठी घातक वर्ष ठरले आहे. आतापर्यंत या वर्षातील २७७ दिवसांमध्ये १८८ हून अधिक नक्षलवाद्यांना सुरक्षा यंत्रणांनी कंठस्नान घातले आहे. काही दिवसांअगोदर नागपुरात बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी काही महिन्यांतच नक्षलवाद्यांवर मोठ्या कारवाया होणार असल्याचे संकेत दिले होते, हे विशेष.

मागील काही कालावधीपासून नक्षलवादाविरोधात सुरक्षा यंत्रणांनी ‘नो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिले आहे. ज्या नक्षलवाद्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात यायचे आहे, त्यांना परत येण्याची संधी दिली जात आहे; परंतु जे नक्षलवादाचा मार्ग सोडत नाहीत, त्यांना सापळा रचून टिपले जात आहे. छत्तीसगडमधील १५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवादी कारवाया सुरू आहेत. यात बस्तर, बिजापूर, दंतेवाडा, धमतरी, गरियाबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, अंबागढ, खैरागढ, सुकमा, कबीरधाम, मुंगेल या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यातही दक्षिण छत्तीसगडमध्ये याचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीतील बरेच नक्षलवादी समूहदेखील त्या भागात स्थलांतरित झाले. २०२४ मध्ये आतापर्यंत १८८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, तर सातशेहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. जवळपास तेवढ्याच नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

मागील काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाईशुक्रवारी झालेली कारवाई ही मागील काही काळातील सर्वांत मोठी कारवाई मानली जात आहे. १६ एप्रिल रोजी बस्तरमध्ये २९ नक्षलवाद्यांना चकमकीत ठार मारण्यात आले होते. २०१६ मधील एका चकमकीत ३० जणांना कंठस्नान घालण्यात आले होते, तर २०२१ मध्ये २५ नक्षलवाद्यांना संपविण्यात आले होते.

२००९ नंतरचा सर्वाधिक संहारकेंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार देशभरात १ जानेवारी २०१९ पासून आतापर्यंत जवळपास सातशे नक्षलवाद्यांना विविध चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी ठार केले. २००९ साली १५४ नक्षलवाद्यांना मारण्यात आले होते. यावर्षीचा आकडा दोनशेहून अधिकवर पोहोचला आहे.

नक्षलवादावर असा होतोय प्रहार- २०१० च्या तुलनेत हिंसेच्या प्रकरणात ७३ टक्क्यांची घट- २०२४ मध्ये नक्षल गतिविधींमध्ये ३२ टक्क्यांची घट- ११ वर्षांत नक्षलप्रभावित जिल्हे १२६ वरून ३८ वर

टॅग्स :naxaliteनक्षलवादीDefenceसंरक्षण विभागMaharashtraमहाराष्ट्रChhattisgarhछत्तीसगड