शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

मराठा आरक्षणावर २०१९ आधी ठोस निर्णय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:52 AM

मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असून, २०१९ आधी यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला जनसुनावणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसरीकडे गावागावांमध्ये गोपनीय सर्वे केला जात आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील राज्य मागासवर्गीय आयोगाने काही दिवसाआधी अहमदनगर येथे जनसुनावणी घेतली. आता पुढच्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी नागपुरातील रविभवनात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराज्य सरकार लागले कामाला : ११ एप्रिलला नागपुरात जनसुनावणी‘लोकमत ’ एक्सक्लुसिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार कामाला लागले असून, २०१९ आधी यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाला जनसुनावणीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. तर दुसरीकडेगावागावांमध्ये गोपनीय सर्वे केला जात आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेतील राज्य मागासवर्गीय आयोगाने काही दिवसाआधी अहमदनगर येथे जनसुनावणी घेतली. आता पुढच्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी नागपुरातील रविभवनात जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. नागपूरनंतर अमरावतीत जनसुनावणी होणार आहे. या जनसुनावणीवेळी आयोगाचे सर्व १०ही सदस्य उपस्थित राहत आहेत. जनसुनावणीसोबतच ग्रामीण भागात सर्वे जोरात सुरू असून याद्वारे गावांमधील मराठा समाजाची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक स्थितीचे आकडे गोळा केले जात आहेत. सूत्रांनी सांगितले की, जनसुनावणी आटोपताच राज्य शासनाला अहवाल देण्याचे निर्देश आयोगाला देण्यात आले आहेत. यानंतर लगेच सर्वेच्या आकड्यांचे विश्लेषण केले जाणार आहे. जर मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरुद्ध कुणी न्यायालयात गेले तर शासनाची बाजू सक्षमपणे मांडता यावी, यासाठी ही सर्व काळजी घेतली जात आहे. आयोगाच्या सदस्यांमध्ये डॉ. सर्जेराव निमसे, सदस्य सचिव डी. डी. देशमुख, सदस्य प्रा. चंद्रशेखर देशपांडे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, डॉ. प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, डॉ. सुवर्णा रावल, राजाभाऊ करपे, डॉ. भूषण व्ही. कर्डिले यांचा समावेश आहे.कोट---सर्वांचे मत ऐकले जाईलया सुनावणीदरम्यान सर्व नागरिक, सामाजिक संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले जाणार आहे. त्यांच्याकडून मराठा समाजाच्या मागासपणाशी संबंधित दस्तऐवज मागितले जातील, सोबतच लिखित अर्जही घेतले जाणार आहेत. या सर्व माहितीच्या संकलनानंतर अहवाल तयार केला जाणार आहे, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. येवले यांनी दिली.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण