शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

नागपूर शहरात डेंग्यूचे २०० रुग्ण : सर्वच इस्पितळांमध्ये रुग्णांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 22:21 IST

डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालय या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. एकट्या नागपुरात आतापर्यंत २०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलांसोबतच मोठेही या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. एकीकडे डेंग्यूसदृश आजाराने उपराजधानी फणफणली असताना त्या तुलनेत महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. अल्प मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीमुळे डासांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. यातच घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असल्याने करावे काय, असा प्रश्न महानगरपालिकेला पडल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण गांधीबाग झोनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालय या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. एकट्या नागपुरात आतापर्यंत २०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलांसोबतच मोठेही या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. एकीकडे डेंग्यूसदृश आजाराने उपराजधानी फणफणली असताना त्या तुलनेत महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. अल्प मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीमुळे डासांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. यातच घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असल्याने करावे काय, असा प्रश्न महानगरपालिकेला पडल्याचे दिसून येत आहे.‘एडिस’ डासाच्या चावण्याने होणाऱ्या डेंग्यूने नागपूरकर गारद झाले आहेत. शहरात २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले, असे असताना सुरुवातीपासून महापालिकेने या आजाराला फारसे गंभीरतेने घेतले नाही. यामुळे याचा फटका नागपूरकरांना बसत आहे. त्याचवेळी मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून योग्य पद्धतीने उपाययोजना केल्या असत्या, आणि डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असती तर आज चित्र वेगळे असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या पाहता हा आकडा ४०० वर जाण्याची शक्यता आहे. मनपाच्या झोनअंतर्गत रुग्णांची संख्या पाहिली असता सर्वाधिक रुग्ण गांधीबाग झोनमध्ये आढळून आले आहेत. गांधीबागमध्ये ४६ तर लकडगंजमध्ये ३० रुग्णमहापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये आतापर्यंत ४६ रुग्ण आढळून आले आहेत. दाटीवाटीची वसाहत, उघड्या नाल्या, तुंबलेले पाणी यामुळे या भागात सर्वात जास्त रुग्ण दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या क्रमांकावर लकडगंज झोन आहे. येथे ३० रुग्णांची नोंद झाली आहे.मनपाच्या झोननिहाय रुग्णगांधीबाग ४६,हनुमाननगर ११,लक्ष्मीनगर १३,धरमपेठ २०,धंतोली ७, नेहरुनगर २५, सतरंजीपुरा १६, लकडगंज३०,आसीनगर८ आणि मंगळवारी२४

टॅग्स :dengueडेंग्यूnagpurनागपूर