शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्यांचे संशोधन आणि प्रजातींच्या विकासासाठी दोन कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 21:59 IST

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविला आहे. या निधीचा उपयोग संत्र्यांचे संशोधन, नवीन प्रजाती आणि कलमांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशासनातर्फे पीडीकेव्हीला निधी प्रदान : लोकमतचा जागतिक संत्रा महोत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची प्रगती आणि उत्पादन वाढविण्यासाठी लोकमततर्फे वर्ष-२०१८ मध्ये आयोजित जागतिक संत्रा महोत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्यानुसार दोन कोटींचा निधी कृषी विभागाने अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला पाठविला आहे. या निधीचा उपयोग संत्र्यांचे संशोधन, नवीन प्रजाती आणि कलमांच्या विकासासाठी करण्यात येणार आहे.विदर्भातील संत्रा उत्पादकांची प्रगती कशी होईल आणि त्यांचा विकास साधण्याच्या दृष्टीने लोकमतच्या वतीने वर्ष-२०१८ मध्ये संत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. लोकमतच्या विनंतीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरून विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या प्रगतीसाठी दोन कोटींचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्याकरिता लोकमतने पाठपुरावा केला होता. निधी न मिळाल्याने एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यांनी तात्काळ दोन कोटींचा निधी मंजूर करण्याचे आदेश राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांना दिले होते. त्यानुसार हा निधी विद्यापीठाला पाठविण्यात आल्याचा दुजोरा डवले यांनी लोकमतशी बोलताना दिला.महोत्सवाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यात येत आहेत. वैदर्भीय संत्रा उत्पादकांच्या समस्या आणि त्यांना काय हवे, याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण संत्र्यांचे उत्पादन कसे वाढेल, सीडलेस प्रजातींचा विकास आणि समस्या कशा सुटेल, यावर महोत्सवात कृषी तज्ज्ञांतर्फे चर्चा करण्यात येते. नागपुरी संत्री जगात प्रसिद्ध आहे. महोत्सवामुळे गेल्यावर्षीपर्यंत संत्रा उत्पादनात चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारताचा क्रमांक तिसऱ्या स्थानावर आला आहे.निधीचा उपयोग संत्र्याच्या विकासासाठीमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या दोन कोटी निधीचा उपयोग संत्र्यावर संशोधन आणि प्रजातीच्या विकासासाठी निश्चितच होईल.व्ही.एस. भाले, कुलगुरू,डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला.जागतिक संत्रा महोत्सव १८ ते २१ जानेवारीपर्यंतयावर्षी लोकमततर्फे जागतिक संत्रा महोत्सवाचे चार दिवसीय आयोजन १८ ते २१ जानेवारीदरम्यान करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत रेशीमबाग मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आयोजन होणार आहे. शिवाय सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात वेगवेगळे उपक्रम आणि ग्राहक प्रदर्शन होणार आहे.

टॅग्स :Orange Festivalआॅरेंज फेस्टिव्हलnagpurनागपूर