शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

नागपुरात  पार्सलमधून होणारी १९.७५ लाखाची सोन्याची तस्करी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 20:58 IST

कुरिअरच्या माध्यमातून मुंबईवरून नागपूरला दुरांतो एक्स्प्रेसने होणारी १९ लाख ७५ हजाराची सोन्याची तस्करी गुरुवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली आहे. दरम्यान पकडलेल्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची कुठलीही रसिद संबंधित कुरिअरच्या कर्मचाऱ्याकडे नसल्यामुळे हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या सुर्पुद करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : सोने-चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कुरिअरच्या माध्यमातून मुंबईवरून नागपूरला दुरांतो एक्स्प्रेसने होणारी १९ लाख ७५ हजाराची सोन्याची तस्करी गुरुवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली आहे. दरम्यान पकडलेल्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची कुठलीही रसिद संबंधित कुरिअरच्या कर्मचाऱ्याकडे नसल्यामुळे हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या सुर्पुद करण्यात आले आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी रेल्वे मार्गाने होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, आरपीएफ जवान विजय पाटील, डी. डी. वानखेडे, शेषराव लांबट, किशोर चौधरी, निळकंठ गोरे यांना गुप्त बातमीदारातर्फे रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार चमूने होम प्लॅटफार्म क्रमांक ८ वर उभ्या असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसच्या मागील लीज एसएलआर कोचची तपासणी केली असता पार्सल उतरविणाऱ्याकर्मचाऱ्याने संबंधित पार्सल क्विक कुरिअर लॉजिस्टीक सर्व्हिसचे असल्याची माहिती दिली. त्यावर कुरिअर सर्व्हिसच्या कर्मचाऱ्याने तो क्विक कुरिअर लॉजिस्टीक सर्व्हिसमध्ये काम करीत असून पार्सलमध्ये हिरे, सोने, चांदी आणि आर्टिफिशिअल ज्वेलरी असल्याची माहिती दिली. त्याबाबतची कोणतीही रसिद किंवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱ्याकडे नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर हे पार्सल उघडण्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी आयकर विभागाला पत्र देऊन आरपीएफ ठाण्यात बोलविण्यात आले. त्यांनी पार्सल उघडून तपासणी केली असता त्यात २ लाख ७९ हजार ६९० रुपयांचे हिरे, १३ लाख ९६ हजार ८९ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ३५ हजार ५१२ रुपयांचे चांदीचे दागिने आणि ६४ हजार ५३२ रुपयांचे आर्टिफिशिअल ज्वेलरी असा एकूण १९ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल आढळला. दरम्यान हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या सुपुर्द करण्यात आले.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर