शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

उष्णतेच्या प्रकोपमुळे १९ राज्ये प्रभावित : व्ही. तिरुपुगूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:37 PM

वाढत्या जागतिक तापमानामुळे तसेच ओझनचा खालावलेला स्तर यामुळे देशात उष्णतेची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु वाढत्या तापमान वाढीमुळे सन २०१८ मध्ये हा आकडा वाढत जाऊन १९ एवढा झाला, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी येथे दिली.

ठळक मुद्देसुरक्षिततेसाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाढत्या जागतिक तापमानामुळे तसेच ओझनचा खालावलेला स्तर यामुळे देशात उष्णतेची तीव्रता अधिक असणाऱ्या राज्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सन २००५ मध्ये देशात उष्णतेच्या प्रकोपामुळे १५ राज्ये प्रभावित झाली होती. परंतु वाढत्या तापमान वाढीमुळे सन २०१८ मध्ये हा आकडा वाढत जाऊन १९ एवढा झाला, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी येथे दिली.राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एनडीएमए), महाराष्ट्र शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर तसेच मध्य भारतातील उन्हाळ्यातील उष्णतेची लाट नियंत्रित करण्याबाबतच्या नियोजनासाठी लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोक येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एनडीएमएचे सदस्य डॉ. डी. एन. शर्मा, लेफ्टनंट जनरल एन. एन. मारवाह, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक अरुण उन्हाळे, डॉ. दिलीप मालवणकर प्रामुख्याने उपस्थित होते.मानव तसेच जनावरांचे उष्णतेच्या लाटेमुळे होणारे मृत्यू थांबविणे हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या हिट अ‍ॅक्शन प्लॅनचा मूळ उद्देश आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कार्यशाळेमुळे राज्य शासनाला उष्णता प्रतिबंधक आराखडा आणि उपाययोजना राबविण्यासाठी सहायभूत ठरेल. तेव्हा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने उष्णतेमुळे प्रभावित राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत संबंधित राज्यांनी याची आतापासूनच अंमलबजावणी सुरु करावी, असे निर्देश राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे संयुक्त सचिव डॉ. व्ही. तिरुपुगूज यांनी दिलेत.एनडीएमएच्यावतीने उष्णतावाढ प्रतिबंधासाठी तत्त्वानुसार हिट वेव्ह अ‍ॅक्शन प्लॅन तयार करुन त्याची व्यापक स्वरुपात प्रसिद्धी आणि अंमलबजावणी करण्याबाबत या कार्यशाळेमध्ये भर देण्यात आला. सन २०१७ पासून राष्ट्रीय स्तरावर हिट वेव्ह अ‍ॅक्शन प्लॅन कार्यशाळा घेतल्या जातात. यंदाची नागपूर येथे आयोजित करण्यात आलेली ही तिसरी कार्यशाळा होय.नागपूरसह विदर्भात उष्णतेचा प्रकोप वाढणारनागपूर शहरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर एनडीएमएमार्फत वातावरणातील बदल, दिवसेंदिवस उष्णतेचा वाढता प्रकोप यावर विशेष तज्ज्ञांमार्फत हिट वेव्ह अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. नागपूर तसेच मध्य भारताला यंदा अधिक तीव्र उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने तीव्र उष्णतेचा तडाखा ज्या संबंधित राज्यांना बसू शकतो, अशा राज्यांना उष्णतेच्या प्रकोपापासून वाचविणे, अधिक तीव्र उष्णतेच्या नवीन ठिकाणांचा शोध घेणे तसेच सामान्य नागरिकांना यापासून सुरक्षित ठेवण्याकरिता यावेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.

 

टॅग्स :Temperatureतापमानweatherहवामान