शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १९ हॉटेल्स, रेस्टारंट असुरक्षित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:27 IST

मुंबई येथील आगीच्या घटनेची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता यात १९ हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने या प्रतिष्ठानांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात महावितरण व जलप्रदाय विभागाला पत्र दिले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे वीज व पाणी तोडण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई येथील आगीच्या घटनेची दखल घेत महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील हॉटेल्स व रेस्टॉरंटची तपासणी केली असता यात १९ हॉटेल्स व रेस्टॉरंटमध्ये आग नियंत्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रणा व सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. या सर्वांना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाने या प्रतिष्ठानांचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यासंदर्भात महावितरण व जलप्रदाय विभागाला पत्र दिले आहे.गंजीपेठ अग्निशमन केंद्राने १३ हॉटेल्स असुरक्षित असल्याचे घोषित केले आहे. सुगतनगर व कॉटन मार्के ट केंद्रातर्फे प्रत्येकी दोन रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली आहे. सिव्हिल लाईन व कळमना अग्निशमन केंद्रातर्फे प्रत्येकी एका हॉटेलवर कारवाई करण्यात आली. नरेंद्रनगर, लकडगंज, सक्करदरा अग्निशमन केंद्राच्या तपासणीत कोणतेही हॉटेल असुरिक्षत असल्याचे निदर्शनास आले नाही. गांधीबाग येथील अकोला अर्बन सहकारी बँक परिसरात अग्निशमन विभागाच्या मानकाचे पालन करण्यात आलेले नाही.महाराष्ट्र आग नियंत्रण व सुरक्षा कायदा २००६ अंतर्गत संबंधित इमारतींना असुरक्षित घोषित करण्यात आले आहे. या हॉटेलमध्ये नियमानुसार मोकळी जागा सोडण्यात आलेली नाही. आपात्कालीन बाहेर पडण्याचा मार्ग व आग नियंत्रणात आणणारी साधने नसल्याचे निदर्शनास आले. बहुसंख्य इमारतींचे बांधकाम राष्ट्रीय इमारत बांधकाम अधिनियमानुसार करण्यात आलेले नाही.नियमांचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली. निकष पूर्ण न करणाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित इमारतीत निर्धारित कालावधीत आवश्यक उपाययोजना न केल्यास अशा इमारतींंना सील करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.मेयो रुग्णालयाला नोटीसअग्निशमन विभागाने इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) नियम ६ नुसार उपाययोजना न केल्याने नोटीस बजावण्यात आली आहे. उपाययोजना नसल्याने वेळप्रसंगी येथे उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या नावाने नोटीस बजावण्यात आली आहे तसेच अन्य २९ मालमत्ताधारकांना अग्निशमन विभागाने नोटिसा बजावल्या आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfireआग