शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकारपणा करणारे १९ सफाई कर्मचारीच साफ!

By मंगेश व्यवहारे | Updated: October 18, 2023 20:33 IST

मनपाची कठोर कारवाई, दोन ऐवजदारांचे कार्ड रद्द

मंगेश व्यवहारे, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या झोनअंतर्गत कार्यरत १९ कामचुकार, बेशिस्त, सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने शिस्तभंगाची कठोर कारवाई करत निलंबित केले. दोन ऐवजदार सफाई कामगारांचे ऐवजी कार्डदेखील रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.

मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी निलंबनाचे आदेश निर्गमित केले आहेत. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे विविध झोन कार्यालयांद्वारे कर्मचाऱ्यांचा बेशिस्तपणा, कामावर गैरहजर राहणे तसेच कामचुकारपणा केला जात असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विभागाद्वारे चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीदेखील सुरू आहे. १९ निलंबित सफाई कर्मचाऱ्यांमध्ये धरमपेठ झोनमधील ६, गांधीबाग झोनमधील ३, नेहरूनगर, लकडगंज आणि मंगळवारी झोनमधील प्रत्येकी २ तसेच लक्ष्मीनगर, हनुमाननगर आणि धंतोली झोनमधील प्रत्येकी एका सफाई कामगाराचा समावेश आहे. सतरंजीपुरा झोनचे ऐवजदार सफाई कामगार प्रमोद शेंडे आणि मंगळवारी झोनचे रोशन मस्त यांचे ऐवज कार्ड रद्द करण्यात आले आहे.

- निलंबित सफाई कर्मचारी

शिस्तभंगाची कार्यवाही करीत मनपाद्वारे निलंबित करण्यात आलेल्या सफाई कर्मचाऱ्यांमध्ये तुषार पप्पू बिरहा, अलोक जावणे, धर्मेंद्र वासनिक, तुकाराम डागोर, कृष्णा ब्राह्मणकर, किशोर सोनोने, अनिल हुमणे, संतोष मोटघरे, सुकांत शिर्के, संदीप बनसोड, राहुल मोगरिया, सुनील कैथेल, कुणाल तांबे, रामू बक्सरे, अमित गोंडाणे, अभिजित बोरकर, पुंडलिक गुडधे, सुभाष ढोबळे आणि कमलेश राऊत यांचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका