शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

केरळातील पेट्रोलपंपावर गुंतवणूक, नागपुरकराला १.८१ कोटींचा गंडा

By योगेश पांडे | Updated: February 9, 2024 21:49 IST

जया फ्युएल्सच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

नागपूर: ३० टक्के नफ्याचे आमिष दाखवत केरळमधील जया फ्लुएल्सच्या पेट्रोलपंपावर गुंतवणूक करायला भाग पाडत तीन आरोपींनी नागपुरकर गुंतवणूकदाराला १.८१ कोटींचा गंडा घातला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून आर्थिक गुन्हे शाखेकडून आता तपास करण्यात येत आहे.

ललिश कुमार (तेलंगखेडी) असे तक्रारदाराचे नाव आहे. त्यांना २०१२ मध्ये केरळ येथील जया फ्युएल्सच्या पेट्रोलपंपावर गुंतवणूक करण्याची योजना सांगण्यासाठी अल्लापुझा येथील थरमकुलम गावातील कन्ननकुझी मुरीतील विजयन पिल्लई, विजयाकुमारी विजयन पिल्लई व नझीम हनिफा रॉथर यांनी संपर्क केला. पेट्रोलपंपावर गुंतवणूक केली तर व्यवसायातील नफ्याच्या ३० टक्के पैसे देण्याचे त्यांनी आमिष दाखविले. लतिश कुमार यांनी वेळोवेळी दीड कोटींहून अधिकची गुंतवणूक केली.

नफ्यासह ही रक्कम १.८१ कोटी इतकी झाली होती. लतिश यांनी नफ्यासह रक्कम परत मागितली असता आरोपींनी त्यांना १.८१ कोटींच्या रकमेचे दोन धनादेश दिले. दोन्ही धनादेश पुढील तारखांचे होते. संबंधित तारखांना लतिश यांनी धनादेश बॅंकेत टाकले असता ते ‘बाऊन्स’ झाले. त्यांनी यानंतर नवीन धनादेशदेखील पाठविले नाहीत व पैसेदेखील परत देण्याबाबत काहीच पावले उचलली नाहीत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लतिश कुमार यांनी अंबाझरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे.

नागपुरातील इतरांचीही फसवणूक ?केरळमधील या आरोपी त्रिकुटाने लतिशकुमार यांच्याप्रमाणे नागपूर व विदर्भातील इतरही लोकांना नफ्याचे आमिष दाखवत फसविले असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून त्या दिशेनेदेखील तपास सुरू आहे.

आरोपी दांपत्य दुबईला फरार ?आरोपींपैकी विजयन पिल्लई, विजयाकुमारी हे पती पत्नी आहे. नागपुरात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच ते दुबईला निघून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध सुरू असून ते दुबईला गेले असतील तर त्यांना परत आणण्याचे प्रयत्न आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येतील.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी