शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्रातील १८ युनिट ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 22:22 IST

वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्टर्न कोलफिल्ड लि. (वेकोलि) मध्ये संप संपल्यानंतरही महाराष्ट्रातील औष्णिक वीज केंद्रात कोळशाची प्रचंड कमतरता आहे. यामुळे ऐन निवडणुकी दरम्यान राज्यात विजेचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. परिस्थिती इतकी भीषण आहे की, राज्यातील क्षमता १०,८४२ मेगावॅट इतकी आहे. परंतु उत्पादन केवळ २८७८ मेगावॅट इतकेच होत आहे. महाजेनकोने कोळशाचा पुरवठा लवकरच वाढण्याचा दावा केला आहे तर महावितरणचे म्हणणे आहे की, पावसामुळे विजेची मागणी कमी आहे. अशा परिस्थितीत केंद्रीय ग्रीड व खासगी वीज केंद्रांच्या भरवशावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल.कोळशाच्या कमतरतेमुळे सर्वाधिक फटका खापरखेडा वीज केंद्राला बसला आहे. येथील युनिट क्रमांक १, २, ४ चे उत्पादन यामुळेच बंद आहे. भुसावळ येथील युनिट क्रमांक १ व ५, चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ३, ५, ७, कोराडी ६,७,८, नाशिकमधील ३, पारस, परळी ६ व ८ सुद्धा बंद आहे. तशीही परळीतील युनिट क्रमांक ४ व ५ आर्थिक कारणांमुळे (महाग वीज) अगोदरच बंद आहे. त्याचप्रकारे पारस येथील युनिट क्रमांक ४ सुद्धा देखभाल दुरुस्तीसाठी बंद आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्राची स्थितीही खूप चांगली नाही. अदानीची तिरोडा येथील युनिट कोळशाअभावी कमी उत्पादन करीत आहे. सध्या अदानीसह खासगी क्षेत्राकडून मिळत असलेले ४ हजार मेगावॅट, एनटीपीसीची ३३८१ मेगावॅट, कोयना जल विद्युतचे ११६७ मेगावॅटच्या भरवशावर राज्य लोडशेडिंमूक्त आहे.वीज वितरण कंपनी महावितरणने दावा केला आहे की, ते परिस्थितीवर नजर ठेवून आहे. लोडशेडिंग होऊ देणार नाही. कंपनीचे म्हणणे आहे की, राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे विजेची मागणी कमी झाली आहे. त्याामुळे पुरवठा करणे कठीण होणार नाही. मागणी वाढल्यास लाडे मॅनेजमेंटवर भर द्यावा लागेल. दुसरीकडे महाजेनकोचे म्हणणे आहे की, पावसामुळे ओल्या कोळशाचा पुरवठा होत आहे. यामुळे उत्पादन प्रभावित होत आहे.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाले होते लोडशेडिंगकोळसा ओला होणे किंवा पुरवठा प्रभावित झाल्याने दरवर्षी सप्टेंबरमध्ये औष्णिक वीज केंद्रासमोर कोळशाचे संकट उभे राहते. प्रत्येक वर्षी हे संकट ओढवते. अनेक दाव्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. यामुळे गेल्या वर्षी ९ ऑक्टोबर रोजी मागणी व पुरवठ्याचे अंतर २५०० मेगावॅटपर्यंत पोहोचल्याने राज्याला लोडशेडिंगचा सामना करावा लागला होता. तसेच २०१७ मध्ये सुद्धा ऑक्टोबर महिन्यात कृषी पंपाच्या वीज पुरवठ्यात दोन तासाची कपात करावी लागली होती. यामुळे ही समस्या कायमस्वरुपी सोडवण्यासाठी ठोस पाऊल का उचलले जात नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :electricityवीज