शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

 नागपुरात सहा महिन्यात १८ मनोरुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 20:09 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू मेडिकल व मेयोमध्ये झाले आहेत. केवळ एक मृत्यू मनोरुग्णालयात झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : सर्वाधिक मृत्यू मेयो, मेडिकलमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू मेडिकल व मेयोमध्ये झाले आहेत. केवळ एक मृत्यू मनोरुग्णालयात झाल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.शासनाने गेल्या हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने मानसिक आरोग्यविषयक धोरण प्रभाविपणे राबविण्यासाठी मानसिक आरोग्य प्राधिकरण समितीची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेतला. यात अभ्यागत समितीच्या कार्यकक्षा वाढविण्यात आल्या. त्यानुसार मानसिक आरोग्य कायदा १९८७ अनुच्छेद पाचमधील भाग क्र १ नुसार कलम ३७, ३८ व ३९ प्रमाणे या समितीने मनोरुग्णालयाचे कामकाज पाहणे सुरू केले आहे. सोबतच समितीच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत मानसिक शुश्रृषागृहांचा परवाना व नूतनीकरणाकरिता गठित केलेल्या समितीचा अहवाल तपासून राज्यस्तरावर शिफारस करणे, दर महिन्याला अभ्यागत समिती सदस्यांच्या बैठकीत मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांना ‘डिसचार्ज’ व प्रमाणपत्र देणे, प्रादेशिक मनोरुग्णालयातील आंतररुग्णांच्या मृत्यूचे ‘डेथ आॅडिट’ करून अहवाल सादर करणे व मनोरुग्णालयाच्या तपासणीकरिता नियमित भेटी देणे आदी जबाबदाऱ्या या समितीवर टाकण्यात आल्या. परंतु त्यानंतरही रुग्णालयातील रुग्णांचे मृत्यू थांबलेले नाहीत. एप्रिल ते आतापर्यंत १८ मनोरुग्णांचे मृत्यू झाले आहे. यातील बहुसंख्य मृत्यू आजारपणामुळे झाले आहेत. .औषधांचा तुटवडाप्राप्त माहितीनुसार, औषध पुरवठा करण्याची जबाबदारी मुंबईच्या हाफकिन कंपनीला देण्यात आली आहे, तेव्हापासून रुग्णालयात औषधांचा तुटवडा पडला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान याविषयी चर्चा होऊ नये म्हणून शासनाने काही निधी दिला होता. या निधीतून मोठ्या संख्येत औषधे खरेदी करण्यात आली. परंतु त्यानंतर निधी न मिळाल्याने रुग्णालयात अनेक महत्त्वाची औषधे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येते.वेळीच औषधोपचाराकडे दुर्लक्षमनोरुग्णालयातील रुग्णांची तपासणीसाठी मेडिकलच्या तीन डॉक्टरांची चमू एकदिवसाआड आपली सेवा देते. परंतु चमूकडून योग्य पद्धतीने तपासणी होत नसल्याच्या तक्रारी आहेत. सोबतच रुग्णालयातील काही डॉक्टर याला गंभीरतेने घेत नसल्याने किंवा तक्रारी येईपर्यंत रुग्णाला पाहत नसल्याने वेळीच औषधोपचार मिळत नसल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, रुग्ण गंभीर होऊन मेयो, मेडिकलला पाठविला जातो. परंतु येथे गाठतो तो मृत्यूच.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयDeathमृत्यू