शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या इंडियन ओव्हरसिज बँकेत पावणेदोन कोटींचा कर्ज घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 20:24 IST

पावणेदोन कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणात अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दोघांच्या मुसक्या बांधल्या. विवेक शरद दिवाण (रा. महाल, नागपूर) आणि रवींद्र पोटदुखे अशी आरोपींची नावे आहेत. इंडियन ओव्हरसिज बँकेच्या इमामवाडा शाखेत बनावट कागदपत्राद्वारे वाहनासाठी कर्ज प्रकरण सादर करून १६ आरोपींनी बँकेला १ कोटी, ७३ लाखांचा गंडा घातला होता. या कर्ज घोटाळ्यात बँकेच्या तीन अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.

ठळक मुद्देफसवणूक प्रकरणात दोघांना अटकएक कारागृहात, दुसरा पोलीस कोठडीतआर्थिक गुन्हे शाखेची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पावणेदोन कोटींच्या कर्जघोटाळा प्रकरणात अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दोघांच्या मुसक्या बांधल्या. विवेक शरद दिवाण (रा. महाल, नागपूर) आणि रवींद्र पोटदुखे अशी आरोपींची नावे आहेत.इंडियन ओव्हरसिज बँकेच्या इमामवाडा शाखेत बनावट कागदपत्राद्वारे वाहनासाठी कर्ज प्रकरण सादर करून १६ आरोपींनी बँकेला १ कोटी, ७३ लाखांचा गंडा घातला होता. या कर्ज घोटाळ्यात बँकेच्या तीन अधिकाऱ्यांचाही सहभाग होता.वाहन घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर करायचे. त्यासाठी बहुतांश कागदपत्रे बनावट तयार करायची. याच कागदपत्रांच्या आधारे दुसºया बँकेत आॅटोमोबाईल्स कंपनीच्या (कार वितरक) नावे खाते उघडायचे. वाहन कर्जाच्या रकमेचा डीडी बँक अधिकाºयांकडून मिळताच तो कार वितरक म्हणून स्वत:च्याच खात्यात जमा करायचा. वाहन घ्यायचेच नाही. मात्र, वाहन घेतल्याचे कागदोपत्री भासवून कर्जाची रक्कम हडप करायची. नंतर बँकेकडे फिरकून पहायचे नाही, असा या आरोपींचा फंडा होता. त्याआधारे त्यांनी इंडियन ओव्हरसिज बँकेत वाहन कर्जाची तब्बल १६ प्रकरणे सादर करून १ कोटी, ७३ लाखांची रोकड उचलली होती. कर्ज घेणाºया या आरोपींनी स्वत:च थापर सन्स मोटर्स, स्टार मोटर्स, सेंट्रल मोटर्स नावाने विविध बँकेत खाते उघडले होते. विशेष म्हणजे, या फसवणूक प्रकरणात बँक अधिकाºयांचाही आरोपींसोबत सहभाग होता. त्यामुळे बरेच दिवस या घोटाळ्याकडे दुर्लक्ष झाले. दरम्यान, पावणेदोन कोटींचा हा कर्ज घोटाळा उघड झाल्यानंतर गुन्हे शाखेकडे त्याचा तपास आला.अखेर गुन्हे दाखलपोलिसांकडे या प्रकरणाची २०१७ मध्ये तक्रार झाली. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विशाल काळे, तसेच त्यांचे सहकारी जितेंद्र धीरज यांनी तपास केला. या घोटाळ्यात बँकेचे वरिष्ठ व्यवस्थापक सुरेश भांडारकर, सह व्यवस्थापक गोपीचंद खांडेकर आणि प्रणाली बगल या तिघांसह १९ आरोपींचा समावेश असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी धरपकड सुरू केली. आतापावेतो १३ आरोपींना अटक करण्यात आली होती. बुधवारी विवेक दिवाण आणि रवींद्र पोटदुखे या दोघांना अटक करण्यात आली.त्यापैकी दिवानची न्यायालयाने कारागृहात (एमसीआर) रवानगी करण्याचे आदेश दिले. त्याच्याविरुद्ध सुमारे १५ लाखांच्या फसवणुकीचा आरोप आहे. तर, पोटदुखेविरुद्ध १० लाखांच्या फसवणुकीचा आरोप होता. त्याला अटक करून पोलिसांनी त्याचा ९ जुलैपर्यंत पीसीआर मिळवला आहे. या प्रकरणातील फरार आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

 

टॅग्स :Crimeगुन्हाfraudधोकेबाजी