शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

कोरोना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 01:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदिले ऑनलाईन प्रशिक्षण : ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार मार्गदर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहींना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणाची परिस्थिती निर्माण करणे, कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी जाणीव-जागृती करण्यास मदत मिळेल.ग्रामपंचायतीमधील स्वच्छाग्रहींना ऑनलाईनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावस्तरावर अपेक्षित असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील १,७३२ स्वच्छाग्रहींनी प्रशिक्षणात आपला सहभाग नोंदवून येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत कोविड-१९ आणि स्वच्छतेच्या संदर्भाने प्रबोधन करणार आहे. जिल्ह्यात ७६९ ग्रामपंचायतींमध्ये पाणी व स्वच्छताविषयक काम करण्यासाठी १९७५ स्वच्छाग्रही कार्यरत आहते. या प्रशिक्षणात कोरोना आजाराची संकल्पना, हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट, घ्यावयाची काळजी, रोग प्रसाराचे मार्ग, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, गावस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी, वयोवृद्ध व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फु साचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, गर्भवती महिला, लहान मुले, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये पाणी, साबण, स्वच्छता, शौचालयाचा वापर, मैला गाळ व्यवस्थापन, सर्वांसाठी सामाजिक अंतर, कोविड- संभाव्यबाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, घरातील उपचार, आजाराचे समज-गैरसमज, मानहानी व भेदभाव याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर