शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

१७० खेळाडूंनी दिली खो-खो साठी चाचणी

By आनंद डेकाटे | Updated: April 25, 2024 14:59 IST

Nagpur : कीर्ती चाचणीला तिसऱ्या दिवशीही उत्तम प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ‘कीर्ती' उपक्रम अंतर्गत क्रीडा क्षेत्रातील प्रतिभावंत खो-खो खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी गुरुवारी पार पडली. विद्यापीठाच्या रविनगरातील क्रीडांगणावर खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून आयोजित असलेल्या निवड चाचणीसाठी तिसऱ्या दिवशी दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. विविध परिसरातील १७० खो-खो पटूंनी निवड चाचणीसाठी सहभाग नोंदविला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या खेलो इंडिया केंद्राच्या माध्यमातून कीर्ती उपक्रम अंतर्गत तिसऱ्या दिवशी खो-खो या खेळातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करण्यासाठी शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी घेण्यात आली. या चाचणीकरिता १११ मुले व ५९ मुली अशा एकूण १७० खेळाडूंनी सहभाग घेतला. या चाचणीकरिता नागपूरसह, वर्धा, चंद्रपूर, वरोरा, भंडारा, सावनेर, काटोल, बालाघाट (मध्य प्रदेश), खापरखेडा आदी शहरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. 

 चाचणी दरम्यान विदर्भ खो-खो संघटनेचे सचिव सुधीर निंबाळकर यांनी भेट दिली. यावेळी विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी, माजी संचालक डॉ. धनंजय वेळूकर, भारतीय खेळ प्राधिकरणाच्या निरीक्षक भावना सुतार, समितीतील सदस्य डॉ. आदित्य सोनी, डॉ. मनोज आंबटकर, डॉ. विवेकानंद सिंग, डॉ. नितीन जंगिटवार, डॉ. अमित टेंभूर्णे, डॉ. सुधीर सहारे, डॉ भरत मेहता, सायली वाघमारे, अर्चना कोट्टेवार, गणेश वाणी, नितीन धाबेकर यांची उपस्थिती होती.  - आज व्हॉलीबॉल चाचणीव्हॉलीबॉल (मुले-मुली) या खेळ प्रकाराकरीता शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता निवड चाचणीस प्रारंभ होणार आहे. यापूर्वी खेळाडूंची शारीरिक क्षमता आणि कौशल्य चाचणी होणार आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूरMaharashtraमहाराष्ट्र