शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १.६७ लाखांचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:44 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मंगळवारी टाकलेल्या धाडीत १.६७ लाख रुपये किमतीचा रिफाईन सोयाबीन तेल आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा साठा जप्त केला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) मंगळवारी टाकलेल्या धाडीत १.६७ लाख रुपये किमतीचा रिफाईन सोयाबीन तेल आणि शेंगदाणा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला आहे. नमुन्यांचे विश्लेषण प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यात येणार आहे.प्राप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी मंगळवारी चंद्रभागा तेल भंडार, आजमशहा ले-आऊट, गणेशनगर, संगम टॉकीज रोड या पेढीवर धाड टाकली. पेढीचे मालक महेश हनुमानप्रसाद जयस्वाल हे रिफाईन सोयाबीन तेल अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या नियमांचे उल्लंघन करून पुनर्वापर केलेल्या १५ किलो/लिटरच्या टिनमध्ये रिपॅकिंग करून तसेच शेंगदाणा तेलाचे पॅकिंग न करता खुले स्वरुपात विक्री करीत असल्याचे आढळले. भेसळीच्या संशयावरून अधिकाऱ्यांनी ३२,२८६ रुपये किमतीचे ३८८.४ लिटर रिफाईन सोयाबीन तेल (मारुती) आणि १.३५ लाख रुपये किमतीचे ८९८.४ किलो शेंगदाणा तेल (लूज) असा एकूण १.६७ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात अन्न सुरक्षा अधिकारी अनंतकुमार चौधरी यांनी केली. सणासुदीच्या दिवसात खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्याने विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असे आवाहन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागraidधाड