शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एक लाखामागे क्षयरोगाचे १६५ रुग्ण : आयएमए

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 23:11 IST

नागपुरात २०१८ मध्ये क्षयरोगाचे एकूण ९८५३ रुग्ण आढळून आले. यात ५११० रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमधून तर ४७४३ रुग्णांनी खासगी इस्पितळांमधून उपचार घेतले. क्षयरोगाबाबत इतर शहराच्या तुलनेत नागपूरची स्थिती बरी आहे. परंतु एक लाख लोकांमागे १६५ क्षयरागाचे रुग्ण आहेत. याला २०२५ पर्यंत प्रति लाख लोकांमागे १० रुग्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्दे क्षयरोगाला समूळ नष्ट करण्यासाठी खासगी इस्पितळांनी समोर यावे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपुरात २०१८ मध्ये क्षयरोगाचे एकूण ९८५३ रुग्ण आढळून आले. यात ५११० रुग्णांनी शासकीय रुग्णालयांमधून तर ४७४३ रुग्णांनी खासगी इस्पितळांमधून उपचार घेतले. क्षयरोगाबाबत इतर शहराच्या तुलनेत नागपूरची स्थिती बरी आहे. परंतु एक लाख लोकांमागे १६५ क्षयरागाचे रुग्ण आहेत. याला २०२५ पर्यंत प्रति लाख लोकांमागे १० रुग्ण करण्याचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास ‘आयएमए’च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेत व्यक्त केला.आयएमए नागपूरचे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल व स्टेट कोऑर्डिनेटर डॉ. मिलिंद नाईक यांनी सांगितले, नागपुरात गेल्या वर्षी क्षयरोगामुळे १२८ रुग्णांचे बळी गेले. मृत्यूचे हे प्रमाण ६ टक्के आहे. भारत सरकारने क्षयरोगाच्या निर्मूलनाचे लक्ष्य ठेवले आहे. त्याअंतर्गत एक मोहीम चालविली जात आहे. खासगी इस्पितळे ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पूर्ण मदत करेल. खासगी इस्पितळांमध्ये क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत सेवा दिली जाते. क्षयरोगाच्या रुग्णांनी औषधोपचार सुरू असताना मध्येच औषध घेणे बंद करू नये. पूर्ण कोर्स करावा. अन्यथा याचे दुष्परिणाम रुग्णांसोबतच समाजावरही पडतात. खासगी डॉक्टरांच्या पुढाकारामुळे क्षयरोगाच्या रुग्णांची शासकीय स्तरावर नोंदणी होत आहे. २०१७ मध्ये खासगी इस्पितळात ६८४८४ रुग्णांनी उपचार घेतले. २०१८ मध्ये ही संख्या वाढून २६७७०६ झाली आहे. महाराष्ट्र क्षयरोग मुक्त करण्यासाठी आयएमएचे सक्रिय योगदान राहिले आहे. त्यांनी सांगितले, ‘निक्षय’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. यामुळे रुग्णाची नोंदणी होताच त्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर