लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी शहरातील चित्तरंजन दास नगरात कारवाई करीत १६ हजार रुपये किमतीचा १.११० किलाे गांजा जप्त केला. आराेपी पळून गेल्याने त्याचा शाेध सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ही कारवाई बुधवारी (दि. २३) रात्री ९ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
माेहता सिंग (३५, रा. चित्तरंजनदास नगर, कामठी) असे फरार आराेपीचे नाव आहे. माेहता सिंग गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळताच पाेलिसांनी त्याच्या पंचायत समिती परिसराजवळ असलेल्या घरी धाड टाकली. मात्र, पाेलीस येत असल्याची कुणकूण लागताच ताे घरून लगेच पळून गेला. झडतीदरम्यान त्याच्या घरातून पाेलिसांच्या हाती १.११० किलाे गांजा लागल्याने पाेलिसांनी ताे जप्त केला. याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक नराेटे करीत आहेत. आराेपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.