शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता ‘कोविड हॉस्पिटल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 22:04 IST

नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते.

ठळक मुद्देकेंद्रीय कॉल सेंटर कार्यान्वित१८७६ बेड्सची उपलब्धता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय रुग्णालयांसोबतच आता कोविड- १९ च्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी खासगी रुग्णालयांनाही मान्यता देण्यात आली आहे. नागपुरातील १६ खासगी रुग्णालये आता पूर्णत: कोविड हॉस्पिटल बनले आहेत. या रुग्णालयात १८७६ बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. यासंदर्भातील आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले होते.मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व रुग्णालयांचे स्वतंत्र आदेश काढून या सर्व रुग्णालयांना कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता दिली आहे. या संपूर्ण रुग्णालयांतील १८७६ एकूण बेड्स पैकी २५६ बेडस् अतिदक्षता कक्षातील आहेत. ऑक्सिजनची उपलब्धता असलेली ९९७ तर ६२३ ऑक्सिजन नसलेले बेड्स आहेत. संपूर्ण रुग्णालय मिळून एकूण ९० व्हेंटिलेटरची व्यवस्था आहे.असे आहेत कोविड हॉस्पिटलकोविड हॉस्पिटल म्हणून म्हणून मान्यता मिळालेल्यात ऑरेंज सिटी हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, सावरकर चौक (१५० बेड्स), सेव्हन स्टार हॉस्पिटल, (१०५), श्री भवानी मल्टी स्पेशालिटी जगनाडे चौक अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्युट, पुनापूर (११०), गंगा केअर हॉस्पिटल, रामदासपेठ (१०५), श्री राधाकृष्ण हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, पूर्व वर्धमान नगर (१५०), लता मंगेशकर हॉस्पिटल सीताबर्डी (१५०), कुणाल हॉस्पिटल, मानकापूर (१००), होप हॉस्पिटल, टेका नाका (१००), सेंट्रल हॉस्पिटल, रामदासपेठ (५०), वोक्हार्ट हॉस्पिटल, गांधीनगर (४५), रेडिअन्स हॉस्पिटल वर्धमाननगर (६५), वोक्हार्ट हॉस्पिटल, नॉर्थ अंबाझरी रोड (११८), किंग्जवे हॉस्पिटल, कस्तूरचंद पार्क जवळ (२२८), अलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि.,मानकापूर (२००), न्यू एरा हॉस्पिटल, टेलिफोन एक्स्चेंज चौक (१००), व्हिम्स हॉस्पिटल (१००) या रुग्णालयांचा समावेश आहे.हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्या काय?कोविड हॉस्पिटल म्हणून मान्यता देण्यात आली आहे, त्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाप्रति काही जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत. अतिगंभीर असेल तर त्याला सर्वप्रथम उपचार देणे, आवश्यकता असेल तर व्हेंटिलेटरवर ठेवणे आणि त्या रुग्णाला स्टेबल करणे, हे त्या रुग्णालयाचे प्रथम कर्तव्य राहील. ज्या रुग्णांकडे थर्ड पार्टी विमा आहे, त्यांच्यावर उपचार करून क्लेमसाठी रुग्णालयानेच विमा कंपनींना पाठवावे. शासनाच्या परिपत्रकानुसार ८० टक्के बेड्स हे आरक्षित ठेवावे आणि त्यावर शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच बिल आकारावे.केंद्रीय कॉल सेंटरमहापालिकेने आता कोविड कॉल सेंटरचा विस्तार करीत केंद्रीय कॉल सेंटर कार्यान्वित केले आहे. तुकाराम मुंढे यांनी बुधवारी या केंद्रीय कॉल सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई उपस्थित होते.३४ कोविड चाचणी केंद्रज्या व्यक्तीला कोविड सदृश लक्षणे आहेत अथवा जे व्यक्ती पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत, त्यांनी तातडीने चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी मनपाने ३४ कोविड चाचणी केंद्राची व्यवस्था केली आहे. ६ कोविड चाचणी केंद्रावर आर.टी.-पीसीआर चाचणीची व्यवस्था आहे. आर.टी.पी.सी.आर. चाचणी ज्या केंद्रांवर होते त्या केंद्रांमध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.), लॉ कॉलेज वसतिगृह, रवि भवन, मॉरिस कॉलेज वसतिगृह, पाचपावली पोलीस वसाहत आणि राज नगर या केंद्रांचा समावेश आहे. येथे सकाळी १० ते २ या वेळेत चाचणी सुरू राहील. अन्य २८ केंद्रांमध्ये मनपाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस