शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

१५ व्या वित्त आयोगाचा नागपूर जिल्ह्याला ३६ कोटीचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 21:28 IST

पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ३ कोटी ६ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनाही मिळणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद व पंचायत समितीलाही मिळणार प्रत्येकी ३.६० कोटी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पंधराव्या वित्त आयोगातून जिल्ह्याला ३६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील ३ कोटी ६ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनाही मिळणार आहे. १४ व्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी हा ग्रामपंचायतीलाच मिळत होता.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विकास कामे करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी देण्यात येते. वित्त आयोगाचा निधी पूर्वी जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत व पंचायत समितीला वळता करण्यात येत होता. काही निधी जिल्हा परिषदांनासुद्धा मिळत होता. परंतु कें द्रात मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी चौदाव्या वित्त आयोगाचा संपूर्ण निधी थेट ग्रामपंचायतींना दिला. गावाची लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर हा निधी देण्यात आला. थेट ग्रा.पं.ला निधी मिळाल्यामुळे ग्रामपंचायती अधिक सक्षम होतील, असा केंद्र सरकारचा कयास होता. परंतु या निधीचा अनेक ग्रा.पं.ला योग्य उपयोग करता आला नाही. या निधीच्या वापरातील काही घोटाळेसुद्धा पुढे आले. नागपूर जिल्ह्यात १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेले एलईडी लाईटमध्ये घोटाळा झाल्याचे समोर आले. याप्रकरणी जवळपास दीडशे सरपंच, ग्रामसेवकांची चौकशी सुरू आहे.पंधराव्या वित्त आयोगातील निधी ग्रामपंचायतीबरोबरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीलासुद्धा मिळणार आहे. जिल्ह्यासाठी एकूण ३६ कोटी १ लाख ७ हजाराचा निधी मंजूर झाला असून, यापैकी प्रत्येकी ३ कोटी ६० लाख ११ हजाराचा निधी हा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना मंजूर करण्यात आला आहे. पूर्वीप्रमाणेच हा निधी जिल्हा परिषदेमार्फत जिल्ह्यातील ७६८ ग्रामपंचायती व १३ पंचायत समित्यांना वळता होणार आहे.

टॅग्स :Nagpur Z.P.जिल्हा परिषद नागपूर