शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिल माफीमुळे १५,८७० कोटींचा बोजा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:13 IST

Nagpur : शेतकरी, महावितरणला फायदा; पण, वसुली नक्की होणार कुठून?

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पात ७.५ एचपी क्षमतेच्या कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार आहे. मात्र, गेल्या वर्षी या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या वीज बिलांवर नजर टाकल्यास या निर्णयामुळे राज्य सरकारवर १५ हजार ८७० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या योजनेची अधिसूचना निघाल्यानंतरच हा खर्च कोठून वसूल होणार हे स्पष्ट होणार आहे. 

राज्य सरकारच्या या योजनेचा शेतकऱ्यांसोबतच महावितरणलाही फायदा होणार आहे. २३-२४ या आर्थिक वर्षाबद्दल बोलायचे झाले तर कृषी पंप जोडणीसाठी एकूण १५ हजार ८७० कोटी रुपये दिले जातील. याबाबतचे विधेयक पारित करण्यात आले आहे. राज्य सरकारने ६ हजार ६३७ कोटी रुपये अनुदान म्हणून दिले आहेत. तर शेतकऱ्यांनी दिलेल्या बिलांचा समावेश करून महावितरणला ६,९२९ कोटी रुपये मिळाले. परंतु, ८ हजार ९४१ कोटी रुपये बिल थकीत होते. आता राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यामुळे संपूर्ण रक्कम महावितरणला मिळेल, असा विश्वास आहे. मात्र, यासंदर्भात अधिसूचना जारी झाल्यानंतरच परिस्थिती स्पष्ट होईल.

या योजनेवर महावितरणचे अधिकारी सध्या काहीही बोलणे टाळत आहेत. अधिसूचना निघाल्यानंतरच यात स्पष्टता येईल. दुसरीकडे राज्य सरकार या निधीचे व्यवस्थापन कुठे करणार, याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सूत्रांच्या माहितीनुसार, वीजदरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, निवडणुकीनंतर पेट्रोल आणि डिझेलवरही सेस लावला जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीजGovernmentसरकार