शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नव्या कायद्याविरोधात विदर्भात १५ हजार ट्रक व ट्रँकरचालकांचे बंद आंदोलन

By मोरेश्वर मानापुरे | Updated: January 1, 2024 20:23 IST

ट्रकचालकांनी महामार्गावर ट्रक केले आडवे, वाहतूक खोळंबली, शहरी बससेवा ठप्प, काहींची विमाने सुटली, कोट्यवधींची उलाढाल ठप्प

नागपूर : केंद्राच्या प्रस्तावित मोटार वाहन कायद्याविरोधात राज्यातील ट्रक आणि टँकर चालकांनी अनिश्चितकालीन संप पुकारला असून त्याच फटका सर्वसामान्यांना बसला. त्यामुळे राज्य सरकारला महसूलावर पाणी सोडावे लागले तर कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. ट्रकचालकांनी घोषणाबाजी करीत कायदा रद्द करण्याची मागणी केली. आंदोलन मंगळवारीही सुरू राहणार आहे.

ट्रकचालकांनी नागपूर सीमेच्या चारही बाजूच्या महामार्गावर ट्रक आडवे ठेवल्याने वाहतूक खोळंबली. जिल्हाधिकाऱ्यांनी जागेवर येऊन आमचे म्हणणे ऐकावे, अशी ट्रकचालकांची मागणी होती. आंदोलनामुळे विदर्भातील जवळपास १५ हजार ट्रक आणि ट्रँकर जागेवरच उभे राहिले. वेळेवर न पोहोचल्याने काही जणांची रेल्वे आणि विमाने सुटल्याची माहिती आहे.

राज्यात निर्माण होणार पेट्रोल व डिझेलचा तुटवडाटँकर चालकांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंदोलनात बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडिया ऑईल या तिन्ही सरकारी तेल कंपन्यांच्या टँकर चालकांचा समावेश आहे. राज्याच्या विविध भागात टँकर बाहेर न पडल्याने इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला. टँकर चालकांचा संप लवकर मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल पुरवठा होण्यास अडचणी येऊ शकतात.

आंदोलकांनी ट्रक रस्त्यावर केले आडवेसरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून ट्रकचालकांनी नागपुरात दुपारनंतर ट्रक महामार्गावर आडवे ठेवल्याने अनेक तास वाहतुकीचा खोळंबा झाला. हे ट्रक अनेक तास महामार्गावर आडवे उभे होते. त्यामुळे शहरी आणि शहराबाहेरील बससेवा पूर्णपणे ठप्प झाली. शिवाय शहरी आपली बस सेवेलाही फटका बसला. प्रवाशांना ऑटोने शहरात यावे लागले. अशी स्थिती सायंकाळपर्यंत होती. शेवटी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर वाहतूक व्यवस्था हळूहळू पूर्ववत झाली.

ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार

नव्या मोटार वाहन कायद्यामध्ये अपघात झाल्याच्या स्थितीत ट्रकचालकाला जबाबदार धरण्यात येणार आहे. या प्रकरणी ट्रक चालकांना १० वर्षांची शिक्षा आणि ७.५ लाखांचा दंड भरावा लागणार आहे. या तरतुदीला देशभरातील ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध करून संप पुकारला. या कठोर कायद्यामुळे ट्रकचालक अडचणीत येणार आहे. चूक नसतानाही त्यांना जेलमध्ये जावे लागेल. सध्या ही तरतूद असली तरीही पुढे कायद्याचे स्वरूप आल्यास ट्रकचालकासह कारचालकही अडचणीत येतील. त्यामुळे केंद्र सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा.कुक्कू मारवाह, अध्यक्ष, नागपूर ट्रक ओनर्स असोसिएशन.

टॅग्स :nagpurनागपूर