शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

नागपूरच्या  सतरंजीपुऱ्यातील १५० लोकांना केले क्वारंटाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 23:37 IST

कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसर्वांची आरोग्य तपासणी करणारहॉटस्पॉट ठरलेल्या भागात ३१३ चमूंच्या माध्यमातून सर्वेक्षण२४ हजार ५५९ घरातील १ लाख ६ हजार ९०९ लोकांची माहिती घेतली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधित रुग्णात सातत्याने वाढ होत असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा परिसरात बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ३० घरातील १५० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. गुरुवारी महापालिकेच्या १२ बसमधून या लोकांना क्वारंटाईन करण्यासाठी नेण्यात आले. या सर्वांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्या १० चमू कामाला लावण्यात आल्या होत्या.नागपूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने मनपा प्रशासनाची चिंता  वाढली आहे. हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा, मोमीनपुरा, शांतिनगर, लालगंज, राजीवनगर व गौतमनगर आदी भागात २२ डॉक्टरांच्या नेतृत्वात आरोग्य विभागाच्या ३१३ चमूंच्या माध्यमातून २४ हजार ५५९ घरातील १ लाख ६ हजार ९०९ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तसेच लक्ष्मीनगर, मंगळवारी व धंतोली झोन क्षेत्रातील अभ्यंकरनगर, खामला, जरीपटका , एम्प्रेस सिटी या भागात १८ डॉक्टरांच्या नेतृत्वात २२५ चमूंच्या माध्यमातून ३० हजार ५१७ घरातील १ लाख १९ हजार ४०४ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.अशाप्रकारे हॉटस्पॉट व बाधित रुग्ण आढळून आलेल्या भागात ४० डॉक्टरांच्या नेतृत्वात ५३८ चमूंच्या माध्यमातून ५५ हजार ७६ कुटुंबातील २ लाख २६ हजार ३०७ लोकांचा सर्वे करण्यात आला आहे. ३२५ लोकांना क्वारंटाईन करण्यात आले.या वस्त्यांमध्ये झाले सर्वेक्षणमोमीनपुरा, सतरंजीपुरा, शांतिनगर, लालगंज, राजीव नगर, गौतमनगर, अभ्यंकरनगर, बजाजनगर,जरीपटका व एम्प्रेस सिटी.असे झाले सर्वेक्षणडॉक्टर : ४०चमू : ५३८घरांची संख्या : ५५ हजार ७६नागरिकांची संख्या : २ लाख २६ हजार ३०७

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर