शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

३० स्मार्ट गावांसाठी १५० कोटींचा आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 00:46 IST

केंद्र शासनाच्या शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रुरबन मिशनमध्ये कामठी तालुक्यातील वडोदासह ३० गावांचा गावसमूह विकासासाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्दे चंद्रशेखर बावनकुळे : राज्यातील सात समूहात वडोदा गाव समूहाचा समावेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: केंद्र शासनाच्या शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियानांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रुरबन मिशनमध्ये कामठी तालुक्यातील वडोदासह ३० गावांचा गावसमूह विकासासाठी निवड झाली आहे. या मिशन अंतर्गत शहराप्रमाणे या समूह विकासासाठी १५० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या.जिल्हा परिषदेच्या डॉ. आबासाहेब खेडकर सभागृहात गुरुवारी शामाप्रसाद मुखर्जी रुरबन अभियान अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज घेतला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी खजांजी, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुरबन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राज्यातील सात गावसमूहाची निवड झाली आहे. या मिशन अंतर्गत प्राधान्यक्रमानुसार राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा घेऊन प्रत्येक विभागनिहाय आराखडा येत्या सात दिवसात सादर करावा. तसेच डिजिटल अंगणवाडी ही संकल्पना प्रत्यक्ष राबविण्यासाठीचा आराखडा प्राधान्याने तयार करण्याच्या सूचना केल्या.रुरबन मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये आर्थिक व तांत्रिक सेवा पुरविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, तसेच गावांचा सर्वांगीण विकास करण्याला प्राधान्य देण्यात आले असून गावाच्या आर्थिक विकासासाठी कृषी व दुग्ध व्यवसायाला चालना, कृषी माहिती तंत्रज्ञान पोहचविण्यासोबतच शेतमालाच्या बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आवश्यक सुविधा यासाठी समूह गटशेतीला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने प्रत्येक घरामध्ये शौचालय, तसेच प्रत्येक घरात गॅस जोडणी, नागरीसेवा, सामाजिक सुविधा, कौशल्य विकासासोबत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या कामांनाही विकास आराखडा तयार करताना समावेश करावा. विकास आराखडा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांकडे सादर करून त्यानंतर या समूहासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनानिहाय अंमलबजावणी संदर्भातील सादरीकरण करावे, अशी सूचना ही त्यांनी केली.

टॅग्स :nagpurनागपूर