शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत मिरगीचे १५ हजार बालरुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 12:42 IST

एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत.

ठळक मुद्देगर्भावस्थेतही अपस्मारवर औषधोपचार सामान्य प्रसूती, स्तनपान सहज शक्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिरगी म्हणजे अपस्मार, हा मेंदूचा आजार आहे. मेंदूमध्ये अचानक व जास्त प्रमाणात तयार होणाऱ्या विद्युतप्रवाहामुळे हा आजार होतो. जगात याचे पाच कोटी रुग्ण आहेत. एका अभ्यासानुसार नागपुरात या आजाराचे ३२ हजार रुग्ण आहेत. यात १५ हजार हे बालरुग्ण आहेत. या आजाराला औषध आहे आणि काही प्रमाणात तो टाळताही येऊ शकतो. विशेषत: गर्भावस्थेतही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेता येतात, यामुळे मिरगीला घाबरू नका, लपवू नका असे आवाहन डॉक्टरांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेतून केले आहे. यावेळी मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. नीरज बाहेती, बालरोग तज्ज्ञ डॉ. विनीत वानखेडे व डॉ. जे. करणकुमार उपस्थित होते.डॉ. बाहेती म्हणाले, मिरगीचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही छोटे तर काही मोठे, काही शरीराच्या एका भागात तर काही पूर्ण शरीरात होतात. काहीमध्ये शुद्ध हरपते, तर काहीमध्ये फक्त दचकल्यासारखं होते. मिरगी आजार होण्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. मेंदूतील अंतर्गत भागांना झालेली दुखापत, मेंदूतील गाठी, मेंदूतील अंतर्गत झटके, डोक्याला अपघातामुळे झालेली इजा किंवा जन्मत:च एखाद्या बाळाच्या मेंदूत असणारा दोष यामुळे असे झटके येतात.‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेतप्रसूत माता मिरगीची रुग्ण असलीतरी तिच्याकडून ‘नॉर्मल डिलिव्हरी’साठी प्रयत्न व्हायला हवेत, असे आवाहन डॉ. बाहेती यांनी केले. ते म्हणाले, अशा रुग्णांकडून नॉर्मल प्रसूती झाल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, प्रसूतीनंतर अशा माता स्तनपान करू शकतात. आजाराचा कुठलाही प्रभाव जन्मजात बाळावर होत नाही.गर्भावस्थेत मिरगीच्या औषधाकडे दुर्लक्ष करणे धोकादायकडॉ. बाहेती म्हणाले, साधारण दोन ते पाच टक्के गर्भवतींना मिरगीचा आजार दिसून येतो. या आजाराला घेऊन अनेक गैरसमज आहेत. यामुळे गर्भावस्थेच्या दरम्यान अनेक महिला औषधे घेणे बंद करतात. परिणामी, गंभीर स्वरूपाचा धोका होण्याची शक्यता १० टक्क्यांनी वाढते. शिवाय, कमी दिवसांचे बाळ जन्माला येण्याची, रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम होत नाही. गर्भावस्थेतही औषधे घेतल्यास ९५ टक्के बालके सुदृढ जन्माला येतात.-तर ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाहीडॉ. विनीत वानखेडे म्हणाले, अपस्माराचे प्रमाण प्रौढ व्यक्तींमध्ये जास्त दिसत असले तरी बहुतांशवेळी त्याची सुरुवात १२ वर्षाच्या आत होते. मुलांचे योग्य वेळेत निदान झाल्यास उपचाराने ७० ते ७५ टक्के मुलांना भविष्यात औषधांची गरज पडत नाही. केवळ पाच टक्के मुलांमध्ये अपस्मारासाठी आयुष्यभर औषधोपचार करावा लागतो. मिरगीचे रुग्णही नॉर्मल जीवन जगू शकतात. सर्व खेळांमध्ये सहभागी होऊ शकतात, शिक्षणातही प्रगती करू शकतात.

टॅग्स :Healthआरोग्य