शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स उलटून १५ जण जखमी

By admin | Updated: May 4, 2015 02:27 IST

नागपूरहून सावनेरला साक्षगंधासाठी येत असलेल्या मंडळींची भरधाव खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढली.

सावनेर : नागपूरहून सावनेरला साक्षगंधासाठी येत असलेल्या मंडळींची भरधाव खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकावर चढली. ही बस अंदाजे १०० फूट फरफटत गेल्यावर उलटली. यात १५ जण गंभीर तर १० जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. हा अपघात नागपूर - सावनेर महामार्गावरील पाटणसावंगी परिसरात रविवारी रात्री ८.२५ वाजताच्या सुमारास झाला.सैयद इरफान (२४), इरशाद अली (२५), इशाक कुरेशी (५५), मोहम्मद सैयद (२७), फिरोज खान (२६), सैयाद अली (१९), फरजाद अली (२२), अब्दुल सलोखी (२२), मोहंमद अली (४१), नौशाद अली (२२), मोहम्मद अबी (२१), रियाकत अली (३५), शेख सैयाद (२५), सैयद जाफर (२४), शेख जावेद (३०) सर्व रा. नागपूर अशी गंभीर जखमींची नावे असून, शेख बब्बू (७०), मोहम्मद शफी (५८), मोहम्मद अन्सारी (६२), अब्दुल हकीम (८०), शेख हफीज (५०) यांच्यासह अन्य पाच जण किरकोळ जखमी झाले. हसनबाग नागपूर येथील रहिवासी हाजी रज्जब अली यांच्या मुलाचे लग्न (निकाह) जुला धान्यगंज सावनेर येथील शफी शेख यांच्या मुलीशी जुळले आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी साक्षगंधासाठी नागपूरहून सावनेरला येण्यासाठी एमएच-४३/एच-१९६२ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने निघाले होते. दरम्यान, ही भरधाव ट्रॅव्हल्स नागपूर - सावनेर महामार्गावरील पाटणसावंगी परिसरात असलेल्या माऊंट फोर्ड आयटीआजवळ पोहोचताच चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि ही भरधाव दुभाजकावर चढली. ही बस वेगात असल्याने ती दुभाजकार १०० फूट दूरपर्यंत फरफटत गेला आणि उलटली. त्यात या बसमधील १५ जण गंभीर तर, १० जण किरकोळ जखमी झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत सावनेर व महामार्ग पोलिसांना सूचना दिली. माहिती मिळताच सावनेर ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पोटे आणि महामार्ग पोलीस विभागाचे सहायक फौजदार राठोड घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना बसमधून बाहेर काढले. काहींना नागपूर येथील मेयो रुग्णालय आणि काहींना सावनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ हलविले. या बसमध्ये एकूण ५० जण होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघात होताच बसचालक पसार झाला. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. (तालुका/प्रतिनिधी)