शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींना दीड कोटीचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 23:29 IST

राज्यात नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहायक अनुदान देण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष रुपये सहायक अनुदान शासनाच्या नगर विकास विभागाने देण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील राज्यातील नगर पंचायतींना ३१ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानाचे परिपत्रक जारी केले आहे.

ठळक मुद्देप्रत्येकी २५ लाख रुपये : भिवापूर, मौदा, महादुला, कुही, हिंगणा आणि पारशिवनीचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात नव्याने स्थापन केलेल्या नगर पंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहायक अनुदान देण्यात येते. नागपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष रुपये सहायक अनुदान शासनाच्या नगर विकास विभागाने देण्याचा निर्णय घेतला असून त्या संदर्भातील राज्यातील नगर पंचायतींना ३१ कोटी ५० लाख रुपयांच्या अनुदानाचे परिपत्रक जारी केले आहे.जिल्ह्यातील मौदा, महादुला, कुही, हिंगणा, भिवापूर आणि पारशिवनी या नगर पंचायतींना प्रत्येकी २५ लक्ष रुपये नागरी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान शासनातर्फे देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या भूमिकेमुळे व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी हे अनुदान मिळत आहे. या निधींतर्गत जे प्रकल्प घेतले जाणार आहेत, त्या प्रकल्पांसाठी कार्यान्वयन यंत्रणा संबंधित नगर पंचायतच राहणार आहे. सर्व कामे ई-निविदा पध्दतीनेच होतील याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकाºयांचीच राहणार आहे.या प्रकल्पांतर्गत कामांना ई-निविदा कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक असेल. या प्रकल्पांतर्गत दुरुस्तीची किंवा परिरक्षणाची कामे घेता येणार नाहीत. नागरी सुविधांचा हा निधी ३१ मार्च २०१९ पर्यंत खर्च करणे आवश्यक राहणार आहे. या निधीमुळे ग्रामीण भागात नागरी सुविधा पुरविणे सोपे होणार आहे.स्वच्छ महाराष्ट्र अभियान कामठीला ४५ लाखस्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत हागणदारीमुक्त झालेल्या एकूण ६१ स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन अनुदानापैकी ३० टक्के रकमेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येत असून ६१ नगर परिषदांमध्ये कामठ़ी नगर परिषदेचा क्रमांक लागला आहे. कामठी न.प.ला ४५ लाख रुपयांचे अनुदान स्वच्छ महाराष्ट्र अभियानात मिळणार आहे. कामठी न.प.ला १ कोटी ५० लाख रुपये प्रोेत्साहन अनुदान देण्यात येणार असून त्यापैकी ३० टक्के म्हणजे ४५ लाख रुपयांचे अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली असून या संदर्भातील शासकीय परिपत्रक २९ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आले आहे. ६१ नगर परिषदा, नगर पंचायतींना २२ कोटी ३५ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय