शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात बँकेची १४.९० लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 19:14 IST

वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.

ठळक मुद्देवाहनासाठी बनावट कागदपत्रांवर कर्ज घेतले पण वाहन खरेदीच केले नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : वाहन खरेदी करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण दाखल करून दोघांनी १४ लाख ९० हजारांचे कर्ज घेतले. मात्र, वाहन विकत घेतल्याची बनावट कागदपत्रे सादर करून वाहनच खरेदी केले नाही. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर ही बनवाबनवी बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यावरून त्यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली.विश्वास पंजाबराव वानखेडे आणि माधव सुभाष बाबलसरे (बेलसरे) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांचे वय काय, ते कुठे राहतात, काय करतात त्याबाबत पोलिसांकडून माहिती स्पष्ट करण्यात आली नाही.बँक आॅफ इंडियाच्या त्रिमूर्तीनगर शाखेत ७ जून २०१७ ला आरोपी वानखेडे आणि बेलसरे यांनी वाहन विकत घेण्यासाठी कर्ज प्रकरण सादर केले. ग्रेस टोयोटोच्या शोरूम मधून वाहन घ्यायचे आहे, असे दाखवत कोटेशन तसेच अन्य कागदपत्रेही सादर केली. त्यानंतर बँकेच्या मागणीनुसार, बनावट कागदपत्रे, ओळखपत्रे दिली. सर्व कागदपत्रे (बनावट) मिळाल्यानंतर बँकेने त्यांना १४ लाख, ९० हजार रुपयांचे वाहन कर्ज मंजूर केले. ही रक्कम उचलल्यानंतर आरोपींनी सदर वाहन खरेदी न करता या रकमेचा गैरवापर केला. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेच्या वसुली अधिकाºयांनी आरोपींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा संपर्कच होत नसल्याने त्यांनी दिलेल्या पत्तावर चौकशी केली. तो पत्ताही बनावट असल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेतर्फे अनिल प्रेमदास राऊत (वय ५६, रा. गुरुदेव अपार्टमेंट) यांनी प्रतापनगर ठाण्यात तक्रार अर्ज दिला. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशीनंतर गुरुवारी उपरोक्त आरोपींवर गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.बँक अधिकाऱ्यांनी काय केले?बनावट कागदपत्रे सादर करून वाहनाच्या नावावर कर्ज घेण्याचे आणि बँकेला गंडा घालण्याचे प्रकार यापूर्वीही प्रतापनगर, एमआयडीसी ठाण्यात नोंदले गेले आहेत. लहानसहान रकमेचे कर्ज मागणाराला विविध कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही बँक अधिकारी झुलवितात. विविध प्रकारचे तारण आणि त्याची बारीकसारीक चौकशी केल्यानंतरच कर्जाची रक्कम देतात. या प्रकरणात अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न आहे. कर्जाची रक्कम देण्यापूर्वी वाहन कंपनीच्या वितरकाकडून आरोपींनी वाहन खरेदी केल्याची खात्री बँक अधिकाऱ्यांनी का करून घेतली नाही, असाही प्रश्न पोलिसांना पडला आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाBank of Indiaबँक ऑफ इंडिया