शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या  बिशप कॉटन स्कूलमध्ये १.४० कोटीचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:19 IST

बोगस दस्तावेजाच्या मदतीने सदर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये १ कोटी ४० लाखाचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देनिवृत्त प्राचार्यासहित तिघांवर गुन्हा दाखल, एक वर्षानंतर झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बोगस दस्तावेजाच्या मदतीने सदर येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये १ कोटी ४० लाखाचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या सेवानिवृत्त प्राचार्या मंगला सॅम्युअल भालेराव, त्यांचे पती सॅम्युअल भालेराव आणि मुलगी तनुश्री भालेराव, रा. उमाशंकर अपार्टमेंट गाकुलपेठ अशी आरोपींची नावे आहेत.मंगला भालेराव या बिशप कॉटन स्कूलमध्ये २००५ ते २०१७ या दरम्यान प्राचार्य होत्या. असे सांगितले जाते की, २०१५ मध्ये त्या ५८ वर्षाच्या झाल्या होत्या. त्यानुसार त्या सेवानिवृत्त होणार होत्या. परंतु त्यांनी बोगस दस्तावेजाच्या आधारावर आपले वय कमी दाखविले. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीला २०१७ पर्यंत वाढ मिळाली. मंगला भालेराव यांची मुलगी तनुश्री भालेराव ही सुद्धा बिशप कॉटन स्कूलमध्ये कार्यरत आहे. मंगलाने मुलगी तनुश्री आणि पतीच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून एकत्र केलेल्या निधीमध्ये हेराफेरी केली. मुलगी आणि पतीच्या मदतीने बोगस दस्तावेज तयार करून शाळेच्या निधीचे १ कोटी ४० लाख ७५ हजार २९७ रुपयाचा अपहार केला. आपल्या कृत्यावर पडदा टाकण्यासाठी त्यांनी मुलीकडेच आपला प्रभार सोपविला.सूत्रानुसार एक वर्षापूर्वी हे प्रकरण समोर आले होते. सीताबर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सीताबर्डीचे तत्कालीन दुय्यम निरीक्षक अनिल वर्टीकर यांनी याचा तपास सुरू केला. नंतर वर्टीकर यांची बदली झाल्यावर एस.एस. परमार हे या प्रकरणाचा तपास करीत होते.सूत्रानुसार या प्रकरणात पोलिसांची भूमिका अतिशय संथ तपासाची होती. त्यामुळे न्यायालयात दाद मागण्यात आली. न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले. यानंतर पोलिसांनाही जाग आली. पोलिसांनी प्रकरण अंगावर उलटेल या भीतीने मंगळवारी भालेराव परिवाराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. परंतु कुणालाही अटक केली नाही. यावर पोलीस काहीही बोलायला तयार नाही.शाळेच्या प्रतिष्ठेला धक्काबिशप कॉटन स्कूल शहरातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. ही शाळा खूप प्रसिद्ध आहे. अतिशय प्रतिभावंत विद्यार्थी येथे घडलेत. या प्रकरणामुळे शाळेच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोहोचला आहे. शाळेतील काही लोकांचेही आरोपींना संरक्षण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :SchoolशाळाCorruptionभ्रष्टाचार