शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
2
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
3
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; थोड्याच वेळात पत्रकार परिषद
5
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
6
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
7
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
8
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी
9
आता तरी एकता दाखवा; काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्याने एअर स्ट्राईकला म्हटले 'टुच्चेपणा'
10
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
11
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
12
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
13
Operation Sindoor : "जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
14
Operation Sindoor : "अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
15
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
16
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
17
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
18
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
19
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
20
Mumbai Rains: ढगांच्या गडगडाटासह कांदिवली, बोरिवली भागात मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ

अडकलेल्या १४ जणांना सुखरूप काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 23:27 IST

उमरेड तालुक्यातील पिपळा (बेला) येथे माय डेअरी कंपनीच्या सभोवताल पाणी साचले होते. या कंपनीच्या इमारतीत मंगळवारपासून अडकलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापैकी नऊ जण कठीण परिस्थितीत होते. सोबतच याठिकाणी अडकलेली ३०० जनावरेही आता सुरक्षित आहेत.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील पिपळा येथील घटना पाण्याखाली असलेली ३०० जनावरे सुरक्षित‘एसडीआरएफ’ चमूचे ऑपरेशन फत्ते

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (उमरेड) : उमरेड तालुक्यातील पिपळा (बेला) येथे माय डेअरी कंपनीच्या सभोवताल पाणी साचले होते. या कंपनीच्या इमारतीत मंगळवारपासून अडकलेल्या १४ कर्मचाऱ्यांना बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास सुखरूप बाहेर काढण्यात आले. यापैकी नऊ जण कठीण परिस्थितीत होते. सोबतच याठिकाणी अडकलेली ३०० जनावरेही आता सुरक्षित आहेत. जनावरे सुरक्षित असली तरी संकटातून बाहेर पडलेल्या नाही. पाऊस अधिक वाढला तर तशीच पूर्ववत परिस्थिती होऊ शकते आणि जनावरांना धोका होऊ शकतो. नागपूर येथील ‘एसडीआरएफ’ या २२ जणांच्या चमूने हे ऑपरेशन फत्ते करीत दिलासा दिला. सुखरूप काढण्यात आलेल्यांमध्ये भारती बडोले ही गर्भवती महिला तसेच किट्टू बडोले या साडेतीन वर्षाच्या मुलीचा समावेश आहे.बेलानजीकच्या पिपळा येथे माय डेअरी या कंपनीचे उत्पादन चालते. याठिकाणी ३०० जनावरे आहेत; शिवाय ८८ च्या आसपास कर्मचारी कर्तव्यावर आहेत. ३० जुलै रोजी संततधार पावसामुळे काही कर्मचारी कंपनीत गेले नाही. केवळ १४ कर्मचारी कंपनीत पोहोचले. अशातच कंपनीच्या सभोवताल पाणी वाढल्याने या ठिकाणी १४ कर्मचारी अडकले.कंपनीच्या इमारतीत जनावरांसाठी शेड तयार करण्यात आलेले आहे. त्या शेडवर चढून आम्ही आपला जीव मुठीत ठेवून होतो. रात्रभर पाऊस वाढू नये, अशी प्रार्थना आम्ही करीत होतो, अशी कैफियत या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. अखेरीस नागपूर येथून एसडीआरएफ या रेस्क्यू ऑपरेशनच्या चमूस पाचारण केल्या गेले. बोट घटनास्थळाकडे नेण्यास अडचण निर्माण झाली असताना, कसेबसे ट्रॅक्टरवरून बोट घटनास्थळाकडे नेण्यात आल्या. सकाळी ७ वाजतापासून या चमूने सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. सातत्याने तीन तास परिश्रम घेत १४ जणांना सुखरूप बाहेर काढले.घनश्याम वाणी, मंगेश टिपले, विनायक काकडे, शांताराम चुटे, मनोहर चुटे, रजत सहारे, जगदीश जंगम, उमेश तिडगाम, धनराज मांडवसकर, विकास बडोले, अमोल नांदूरकर, किट्टू बडोले, भारती बडोले आणि कुंदा नांदूरकर यांचा अडकलेल्यांमध्ये समावेश आहे. सदर कामगिरी एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे यांच्या नेतृत्वात यशस्वीरीत्या पार पडली.सारेच गहीवरलेविशेषत: या कंपनीत जनावरांसाठी टिनाचे शेड तयार करण्यात आले आहेत. हळुहळू पाणी वाढत गेल्याने आता आपल्या जीवास धोका होऊ शकतो, ही बाब लक्षात येताच अडकलेल्या १४ जणांनी जनावरांच्या शेडवर रात्री मुक्काम ठोकला. जनावरांच्या मानेपर्यंत पाणी होते. अन्न-पाण्यावाचून या सर्वांनी कशीबशी रात्र काढली. सकाळीच १०.३० वाजताच्या सुमारास सर्वांची सुखरूप सुटका झाल्यावर सारेच गहिवरले. सर्वांनी एसडीआरएफच्या चमूचे आभार मानले.

टॅग्स :floodपूरnagpurनागपूर