शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खोटी कागदपत्रे जोडून नागपूर जिल्ह्यात बँकेची १४ लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 12:06 IST

कार खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करून वाहन कर्जाची उचल करणाऱ्या दोघांनी बँकेची १४ लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे नुकताच उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देपाटणसावंगी येथील प्रकारगुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कार खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करून वाहन कर्जाची उचल करणाऱ्या दोघांनी बँकेची १४ लाख रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे नुकताच उघडकीस आला आहे.सुरेंद्रसिंग गोविंदसिंग राठोड, रा. वेकोलि कॉलनी, चनकापूर, ता. सावनेर व खेमराज गिरीधर मोवाडे, रा. नागमंदिर, सावनेर अशी आरोपींची नावे आहेत.या दोघांनीही पाटणसावंगी येथील भारतीय स्टेट बँकेत वाहनकर्ज मिळविण्यासाठी अर्ज केला होता. त्यासाठी त्यांनी अर्जासोबत खोटी कागदपत्रे जोडली होती. बँकेने कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना १४ लाख रुपयांचे वाहन कर्ज मंजूर केले. नंतर त्यांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी असून, त्यांनी या रकमेची उचल करून कार खरेदी केली नसल्याचे निदर्शनास आले. या व्यवहारात बँकेची १४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच, बँकेचे प्रबंधक सुरेश रामचंद्र रामटेके (५९, रा. जरीपटका, नागपूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी भादंवि ४०६, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर करीत आहेत.

जिल्ह्यातील तिसरी घटनाबँकेत खोटी कागदपत्रे सादर करून वाहनकर्जाच्या नावावर बँकेची फसवणूक करण्याचा हा नागपूर जिल्ह्यातील महिनाभरातील तिसरा प्रकार होय. विशेष म्हणजे, आरोपींची या तिन्ही घटनांमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या रामटेक, खापरखेडा (ता. सावनेर) व पाटणसावंगी (ता. सावनेर) शाखांमधून रकमेची उचल करून वाहन खरेदी न कता, ती रक्कम अन्य कामांसाठी वापरली. या प्रकारातील आरोपींची संख्या मोठी असून, बहुतांश आरोपी सावनेर शहर व तालुक्यातील रहिवासी आहेत. तिन्ही घटनांबाबत पोलिसांत तक्रार नोंदविल्या असल्या तरी, पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केली नाही.

टॅग्स :Crimeगुन्हा