शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

१,३१८ लक्षवेधी, ९,२३१ प्रश्न, ६० हजार कोटींच्या पूरक मागण्या, हिवाळी अधिवेशनाची रूपरेषा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 11:16 IST

Nagpur Winter Session: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी सूचना आणि आमदारांच्या प्रश्नांचा पूर आला आहे. गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यास सुरुवात झाली.

नागपूर - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी लक्षवेधी सूचना आणि आमदारांच्या प्रश्नांचा पूर आला आहे. गुरुवारपासून लक्षवेधी सूचना स्वीकारण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात १,३१८ लक्षवेधी सूचना सादर करण्यात आल्या तर ९,२३१ प्रश्न एकत्रितपणे मांडण्यात आले आहेत. दुसरीकडे राज्य सरकार याच अधिवेशनात ६० हजार कोटी रुपयांच्या विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर करून मार्चपर्यंत आर्थिक संकटावर मात करण्याच्या मनस्थितीत आहे.

बुधवारी झालेल्या विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नागपुरातील हिवाळी अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या कालावधीत चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. आता अधिवेशन संपण्यापूर्वी समिती अधिकृतपणे आपल्या समाप्तीची तारीख ठरवेल. मात्र, हे अधिवेशन २० तारखेलाच संपणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कालावधीत एकूण १० दिवसांचे काम असेल. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६० हजार कोटींहून अधिक किमतीच्या पुरवणी मागण्या मांडल्या जाणार आहेत. त्यावर ११ आणि १२ डिसेंबरला चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच ८ डिसेंबरला मराठा आरक्षणावर चर्चा होणार आहे. 

प्रश्नोत्तराच्या तासात प्रश्न विचारण्यासाठी आतापर्यंत दोन्ही सभागृहात आमदारांनी १,३१८ लक्षवेधी तर ९,२३१ प्रश्न मांडले आहेत.  विधिमंडळ सचिवालय आता या प्रस्तावांचा आढावा घेणार आहे. सभागृह संपण्याच्या तीन दिवस आधी लक्षवेधी प्रस्ताव स्वीकारले जाणार असल्याने त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अधिवेशन काळात किती विधेयके मांडायची याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.  

कुठे किती प्रश्नसभागृह     लक्षवेधी     प्रश्न विधानसभा     १,०६४    ७,४१३विधान परिषद     २५४    १,८१८एकूण     १,३१८    ९,२३१

मराठा आरक्षण, अतिवृष्टीवर भर  हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षण आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर अधिक भर दिला जाणार असल्याचे मानले जात आहे. यासोबतच विदर्भ आणि मराठवाड्यासाठीही योजना जाहीर होण्याची शक्यता आहे.

अर्धा तास चर्चेवर भर  प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, आमदार प्रश्न विचारून आणि लक्षवेधी प्रस्ताव मांडून सरकारसमोर आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न करतात. या दोन शस्त्रांशिवाय त्यांना अर्धा तास चर्चा बोलावण्याचा पर्यायही आहे. विधानसभेत अर्धा तास चर्चेसाठी आतापर्यंत विधिमंडळ सचिवालयाला ९५ प्रस्ताव आले आहेत.

टॅग्स :nagpurनागपूरvidhan sabhaविधानसभा