लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन वेगवेगळ्या कारवायांत दारूच्या ३६ हजार २९० रुपये किमतीच्या १२७ बॉटल्स जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक दिलीप कुमार, रजनलाल गुर्जर, विकास शर्मा, विवेक कनोजिया, सुशील मलिक यांनी गुरुवारी रात्री प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर १२६२२ तामिळनाडू एक्स्प्रेसची तपासणी केली असता जनरल कोचमध्ये एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. बॅगवर कोणत्याच प्रवाशाने आपला हक्क सांगितला नाही. त्यात दारूच्या २ हजार ३७० रुपये किमतीच्या ६३ बॉटल्स होत्या. त्यानंतर रात्री १२.१५ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर दक्षिण एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानांना १२ हजार ७२० रुपयांच्या दारूच्या २४ बॉटल्स मिळाल्या. शुक्रवारी दुपारी आरपीएफचा जवान विकास शर्मा यास रेल्वेगाडी क्रमांक १६०९४ लखनौ-चेन्नई एक्स्प्रेसने दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्याने उपनिरीक्षक कृष्णानंद राय, आर. के. त्रिपाठी, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे, विवेक कनोजिया यांच्यासोबत या गाडीची तपासणी केली. यावेळी जनरल कोचमध्ये एका बेवारस बॅगमध्ये दारूच्या २१ हजार २०० रुपये किमतीच्या ४० बॉटल्स आढळल्या. पकडण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.
दारूच्या १२७ बॉटल्स जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:37 IST
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन वेगवेगळ्या कारवायांत दारूच्या ३६ हजार २९० रुपये किमतीच्या १२७ बॉटल्स जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत.
दारूच्या १२७ बॉटल्स जप्त
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : चंद्रपूर जिल्ह्यात दारूची तस्करी सुरूच