शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

नागपूरच्या स्क्रॅप व्यावसायिकाला १२.२४ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:43 IST

बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देबंगळुरूच्या तिघांचे कृत्य : एजंटची मुख्य भूमिका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.कमल प्रल्हादराय अग्रवाल (वय ५६, रा. नंदलोक अपार्टमेंट, नंदनवन) यांचे कळमन्यातील भरतनगरात कमल ट्रेडिंग नावाने जुन्या बॅटरीचे (भंगार) दुकान आहे. आरोपी मनोज नेवतिया (रा. रामनगर) या धंद्यात कमिशन एजंट म्हणून काम करतो. अग्रवाल यांच्या तो ओळखीचा आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये मनोज अग्रवाल यांच्या दुकानात आला. बंगळुरूमधील व्यापाऱ्यांकडे १०० टन बॅटरी स्क्रॅप असल्याची माहिती त्याने दिली. आपल्या संपर्कातील हे व्यापारी असून, त्यांचा व्यवहार चांगला असल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे अग्रवाल सप्टेंबर २०१८ मध्ये मनोजसोबत बॅटरीचा सौदा करण्यासाठी बंगळुरूला गेले. तेथे आरोपी हाजी सैयद, हाफिज सैयद आणि रहमानभाई (तिघेही रा. जुने विमानतळ, इस्लामपूर मशिदीजवळ, बंगळुरू) यांनी अग्रवाल यांना स्क्रॅप बॅटरीचे गोदाम दाखविले. मात्र, सध्या २१ टनच बॅटरीचाच माल असून, नंतर थोडे थोडे करून माल पाठवू, असे ते म्हणाले. अग्रवाल यांनी हा सौदा करण्यास नकार दिला. मात्र, आरोपी मनोज नेवतियाने हट्ट धरल्यामुळे अग्रवाल यांनी आरोपी हाजी सैयद तसेच हाफिज सैयदसोबत सौदा केला. नंतर ते नागपुरात परत आले आणि त्यांनी त्यांचा नोकर शेख फारुक शेख मोहम्मद याला सौदा केलेला माल घेण्याकरिता बंगळुरूला पाठविले. १४,०५० किलोग्राम माल ट्रकमध्ये भरल्यानंतर त्याचे फोटो तसेच इनव्हाईस फारुकने अग्रवाल यांना पाठविले. उर्वरित माल नंतर येणार असल्याचे कळवले. त्यानुसार, अग्रवाल यांनी एचडीएफसी तसेच युनियन बँकेतून आरोपींच्या खात्यात १२ लाख २४,५३० रुपये आरटीजीएसने जमा केले तर, त्याचे कमिशन म्हणून २८ हजार रुपये नेवतियाच्या खात्यात जमा केले. १२ ते २२ सप्टेंबर २०१८ ला हा व्यवहार पार पडला.नंतर अग्रवाल मालाचा ट्रक कधी येतो म्हणून वाट बघू लागले. बरेच दिवस होऊनही माल पोहचला नसल्याने त्यांनी आरोपींशी संपर्क साधला. आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ चालवली. आता पाच महिने होऊनही आरोपींकडून अग्रवाल यांना माल मिळालाच नाही. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने अग्रवाल यांनी कळमना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी हाजी सैयद, हाफिज सैयद आणि रहमानभाई तसेच नेवतियाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला. पुढील तपास सुरू आहे.

 

टॅग्स :businessव्यवसायfraudधोकेबाजी