शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या १२ वर्षाच्या रौनकने जगज्जेत्याला फोडला घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 00:06 IST

तब्बल पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताचा ग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंदला ६४ घरांच्या खेळात नागपूरच्या अवघ्या १२ वर्षाच्या रौनकने तब्बल ६ तास रोखून धरले. त्यातही पहिल्या चार तासात रौनक मास्टरवर वरचढ ठरला होता. एका छोट्याशा चुकीच्या चालीमुळे रौनकला मास्टरला पछाडण्यात अपयश आले. पण अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने ४ वर्षाच्या खेळाच्या अनुभवावर जगज्जेत्याला घाम फोडला होता.

ठळक मुद्देग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंद यांच्यासोबत  ६ तास कडवी झुंजराष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत फडकावला नागपूरचा झेंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तब्बल पाच वेळा जगज्जेता ठरलेल्या भारताचा ग्रॅण्ड मास्टर विश्वनाथन आनंदला ६४ घरांच्या खेळात नागपूरच्या अवघ्या १२ वर्षाच्या रौनकने तब्बल ६ तास रोखून धरले. त्यातही पहिल्या चार तासात रौनक मास्टरवर वरचढ ठरला होता. एका छोट्याशा चुकीच्या चालीमुळे रौनकला मास्टरला पछाडण्यात अपयश आले. पण अवघ्या १२ वर्षाच्या मुलाने ४ वर्षाच्या खेळाच्या अनुभवावर जगज्जेत्याला घाम फोडला होता.जरीपटक्यातील रहिवाशी, सेंटर पॉर्इंट स्कूलचा ७ व्या वर्गाचा विद्यार्थी असलेला रौनक भरत साधवानी याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत अनेक मानांकन पटकावत नागपूरचे झेंडा रोवला आहे. बुद्धिबळात हा चिमुकला भविष्यात उंच भरारी घेईल, असे त्याच्या खिताबावरून दिसते आहे. रौनकच्या घरात बुद्धिबळाचा कुणी खेळाडू नाही. त्याच्या वडिलांना थोडीफार आवड आहे. तो ८ वर्षाचा असताना उन्हाळ्याच्या सुटीत वडिलांनी त्याला बुद्धिबळ शिकविले. तो या खेळात रमू लागला. त्याचे आकर्षण वाढले. ९ वर्षाचा असताना लोकल स्पर्धेमध्ये रौनकने पहिले पारितोषिक पटकावले. रौनकची खेळामध्ये रुची बघून वडिलांनी त्याला कोचिंग लावून दिले. त्यानंतर त्याचा खेळ इतका बहरला की, तो अवघ्या १२ वर्षाच्या वयात २०१८ मध्ये थेट जगज्जेत्याशी भिडला. एवढेच नाही तर तो अंडर १९ नॅशनल स्पर्धेमध्ये मोठ्या वयाच्या खेळाडूंशी झुंज देऊन ब्रॉन्झ मेडलचा मानकरी ठरला. रौनकची आंतरराष्ट्रीय रँकिंग २४३४ आहे.रौनकची आतापर्यंतची कामगिरी

  • यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर फ्रॉम महाराष्ट्र
  • दुबई येथे झालेल्या ज्युनियर अंडर १४ स्पर्धेत मध्ये गोल्ड मेडल
  • नॅशनल ज्युनिअर अंडर १९ मध्ये ब्रॉन्झ मेडल
  • एशियन युथ ब्लिथमध्ये सिल्वर मेडल
  • एशियन युथ चेस चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल
  • २०१५ च्या कॉमन वेल्थमध्ये गोल्ड
  • २०१४ मध्ये नॅशनल चेस चॅम्पियन
  • २०१४ मध्ये स्टेट चेस चॅम्पियन
टॅग्स :nagpurनागपूर