लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्रान्स आणि भारतीय रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारले आहे. या इंजिनची आमला ते नागपूर अशी चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे.मेक इन इंडिया’अंतर्गत हे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारण्यात आले आहे. बिहारमधील मधेपुरा येथे अशा प्रकारच्या इंजिनचे उत्पादन होत आहे. या इंजिनची देखभाल अजनी येथे साकारत असलेल्या लोकोशेडमध्ये होणार आहे. अजनीत २०२२ पर्यंत हे लोकोशेड साकारण्यात येणार आहे. मधेपुरा येथे देशातील पहिलेच १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारण्यात आले आहे. हे इंजिन दर तासाला १०० किलोमीटर या वेगाने धावणार आहे. भविष्यात त्याचा वेग १२० किलोमीटर प्रती तास होणार आहे. यामुळे मालगाड्या अधिक वेगाने धावू शकतील. या इंजिनमध्ये जीपीएसची सुविधा आहे.त्यामुळे मालगाडीचे नेमके लोकेशन कळणार आहे. आमला ते नागपूर दरम्यान या इंजिनची चाचणी घेण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आणि अधिकारी उपस्थित होते. सध्या लोकोपायलटच्या प्रशिक्षणासाठी नागपूर विभागात हे इंजिन उपलब्ध झाले आहे.
नागपुरात १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन झाले दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 21:15 IST
फ्रान्स आणि भारतीय रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारले आहे. या इंजिनची आमला ते नागपूर अशी चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे.
नागपुरात १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन झाले दाखल
ठळक मुद्देआमला ते नागपूर धावली पहिली मालगाडी