नागपुरात १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन झाले दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 09:13 PM2020-07-30T21:13:52+5:302020-07-30T21:15:48+5:30

फ्रान्स आणि भारतीय रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारले आहे. या इंजिनची आमला ते नागपूर अशी चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे.

12 thousand horse power engine was reached at Nagpur | नागपुरात १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन झाले दाखल

नागपुरात १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन झाले दाखल

Next
ठळक मुद्देआमला ते नागपूर धावली पहिली मालगाडी

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : फ्रान्स आणि भारतीय रेल्वेने मिळून बिहारमधील मधेपुरा येथे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारले आहे. या इंजिनची आमला ते नागपूर अशी चाचणी यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे.
मेक इन इंडिया’अंतर्गत हे १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारण्यात आले आहे. बिहारमधील मधेपुरा येथे अशा प्रकारच्या इंजिनचे उत्पादन होत आहे. या इंजिनची देखभाल अजनी येथे साकारत असलेल्या लोकोशेडमध्ये होणार आहे. अजनीत २०२२ पर्यंत हे लोकोशेड साकारण्यात येणार आहे. मधेपुरा येथे देशातील पहिलेच १२ हजार हॉर्स पॉवरचे इंजिन साकारण्यात आले आहे. हे इंजिन दर तासाला १०० किलोमीटर या वेगाने धावणार आहे. भविष्यात त्याचा वेग १२० किलोमीटर प्रती तास होणार आहे. यामुळे मालगाड्या अधिक वेगाने धावू शकतील. या इंजिनमध्ये जीपीएसची सुविधा आहे.त्यामुळे मालगाडीचे नेमके लोकेशन कळणार आहे. आमला ते नागपूर दरम्यान या इंजिनची चाचणी घेण्यात आली. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार आणि अधिकारी उपस्थित होते. सध्या लोकोपायलटच्या प्रशिक्षणासाठी नागपूर विभागात हे इंजिन उपलब्ध झाले आहे.

Web Title: 12 thousand horse power engine was reached at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.