शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसकडे १२ जागांचा प्रस्ताव; अन्यथा सर्व ४८ जागा लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 11:30 IST

काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर यांचे सुतोवाच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आमची लढाई ही संविधान वाचवण्याची आहे. काँग्रेस संविधान मानणारी आहे, म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आम्ही आजवर ज्या समाजाला प्रतिनिधित्वच मिळालेले नाही, अशा वंचित घटकांना प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसकडे १२ लोकसभेच्या जागांचा प्रस्ताव ठेवला आहे, त्यावर अजून चर्चा सुरू असेल असे आम्ही समजतो. हा प्रस्ताव काँग्रेसने मान्य केला तर काँग्रेसची सत्ता येऊ शकते. अन्यथा आम्ही पूर्ण ४८ जागा लढवणार, असे भारिप बहुजन महासंघाचे नेते आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने शुक्रवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात सत्ता संपादन निर्धार मेळावा व संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, धनगर, भटके विमुक्तांसह विविध वंचित समाजाने आता हा निर्णय घेतला आहे की, स्वातंत्र्याच्या ७० वर्षात त्यांना कुठल्याच सरकारकडून काहीही मिळालेले नाही. त्यांचा केवळ वापरच करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता आपणच सत्ता हस्तगत करावी आणि आपले प्रश्न सोडवून घ्यावे. ही वस्तुस्थिती काँग्रेसने लक्षात घेणे गरजेचे आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आहे. काँग्रेस संविधानाला मानते म्हणून त्यांना लोकसभेच्या १२ जागा यामध्ये दोन माळी समाज, दोन लहान ओबीसी, दोन भटके विमुक्त, दोन मुस्लीम, दोन धनगर समाजासाठी मागण्यात आल्या आहेत.परंतु काँग्रेस यांना प्रतिनिधित्व देण्याच्या तयारीत नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले आहे की, मलाच त्यांच्यासोबत जायचे नाही. शरद पवार यांनी काँग्रेस सोडली तेव्हा सोनिया गांधी यांच्यासोबत मी गेलो नसतो तर देशात सोनिया गांधी यांचे नावही दिसले नसते, असेही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.तत्पूर्वी देशपांडे सभागृहात पार पडलेल्या संवाद मेळाव्याला राजू लोखंडे, माजी आमदार लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजयराव मोरे, माना समाजाचे रमेश गजबे, धनगर समाजाचे रमेश देवाजी पाटील, हलबा समाजाचे डॉ. सुशील कोहड, प्रा. बी.के. हेडाऊ, अरविंद सांदेकर, सागर डबरसे, लटरू मडावी, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, अजय सहारे आदींनी मार्गदर्शन केले.

नोटाबंदीदरम्यान आरएसएसला ३०० कोटीची गुरुदक्षिणानोटाबंदीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भाजपकडून ३०० कोटी रुपयांची गुरुदक्षिणा मिळाली, अशी टीका करीत त्या नोटा आरएसएसने कोणत्या बँकेत ठेवल्या किंवा कशा बदलून घेतल्या, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसेच नोटा बदलवणे किंवा रद्द करण्याचा अधिकार पंतप्रधानांना नाही. तो रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला आहे. तेव्हा हा अधिकार पंतप्रधानांना कसा दिला, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरविरुद्ध फौजदारी याचिका दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी मेळाव्यात दिला.

प्रकाश आंबेडकर यांना २०१९ मध्ये मुख्यमंत्री तर २०२४ मध्ये पंतप्रधान बनवणारलक्ष्मण माने यांनी महराष्ट्रातील सर्व वंचित घटकांनी आता २०१९ च्या निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री आणि २०२४ मध्ये पंतप्रधान करण्याचा संकल्प केला असल्याचे संवाद मेळाव्यात बोलताना जाहीर केले. पत्रपरिषदेत बोलताना त्यांनी दिल्ली येथे संविधानाची होळी करणाऱ्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच साध्या गणेश मंडळांनाही पावती फाडण्यासाठी नोंदणी आवश्यक असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ती का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आमचे सरकार आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्यानुसार नोंदणी करायला लावू अन्यथा त्यांच्या संघटनेवर बंदी घालू, असे जाहीर केले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर