शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेश : निकालाच्या दीड महिन्यानंतर सुरू हाेणार प्रवेश

By निशांत वानखेडे | Updated: June 24, 2025 20:02 IST

२६ला लागेल काॅलेज अलाॅटमेंटची यादी : २७ पासून पहिल्या फेरीचे प्रवेश

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीअंतर्गत अकरावी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रिया गुरुवार, २६ जूनपासून पुन्हा वेग घेणार आहे. २६ तारखेला विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर हाेणार आहे. २७ पासून पहिली फेरी सुरू हाेणार असून, विद्यार्थी प्रत्यक्ष मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील.

अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १९ मेपासून सुरू करण्यात आली हाेती. सराव नाेंदणीनंतर २१ मेपासून प्रत्यक्ष नाेंदणी सुरू हाेणार हाेती. मात्र, पहिल्याच दिवशी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ ठप्प पडले आणि प्रक्रिया खाेळंबली. पुढे २६ मेपासून पुन्हा नाेंदणी सुरू करण्यात आली. ३ जूनपर्यंत असलेली मुदत पुढे ५ जून व नंतर ८ जूनपर्यंत वाढविण्यात आली. ११ व १२ जूनला महाविद्यालयीन काेटा प्रवेश घेण्यात आले. १४ जूनपासून सामान्य प्रवेश सुरू हाेणार हाेते. मात्र, शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रिया तब्बल १०-१२ दिवस पुढे ढकलली. म्हणजे १३ मे राेजी जाहीर झालेल्या दहावीच्या निकालाला तब्बल दीड महिना लाेटल्यानंतर आता कुठे अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात हाेणार आहे.

२७ जून ते ३ जुलैपर्यंत प्रवेशाची पहिली फेरी चालणार आहे. या काळात विद्यार्थी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश करू शकतील. ज्यांना पसंतीचे महाविद्यालय मिळाले नाही, ते विद्यार्थी दुसऱ्या फेरीसाठी लाॅगीनमध्ये नाेंद करू शकतील. या काळात नवीन विद्यार्थी नाेंदणी करू शकतील आणि भाग १ लाॅक करतील. विद्यालयांनी काेटा प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागा कॅप राउंडमध्ये प्रत्यार्पित करायच्या आहेत. ४ जुलै राेजी रिक्त जागा प्रदर्शित करून दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू हाेईल.

...असे आहे वेळापत्रक

  • सध्या २४ व २५ जून राेजी विद्यार्थ्यांनी काेटा प्रवेशासाठी ऑनलाइन पसंती नाेंदविणे व लाॅक करणे.
  • २६ जून : पाेर्टलवर विद्यार्थ्यांना अलाॅट झालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर करणे. लाॅगीनमध्ये तपशील दर्शविणे व विद्यार्थ्यांना माेबाइल संदेश पाठविणे.
  • २७ जून ते ३ जुलै : प्रवेशाची पहिली फेरी. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे.
  • ३ जुलै रात्री ८:०० पर्यंत : विद्यालयांना प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती पाेर्टलवर अपलाेड करायची आहे.
  • ४ जुलै राेजी रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाईल.

 

नाेंदणी केवळ ४० हजारनागपूर जिल्ह्यात १९८ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी प्रवेशाच्या ९८ हजार जागा आहेत. त्यासाठी आतापर्यंत केवळ ४० हजाराच्या जवळपास विद्यार्थ्यांची नाेंदणी झाली आहे. पाॅलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रियेनंतर प्रवेश वाढतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, यंदासुद्धा ५० टक्के जागा रिक्त राहतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAdmissionप्रवेश प्रक्रियाEducationशिक्षण