लोेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांसाठी जिल्हा प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीची व्यवस्था केली. जागोजागी अडकलेल्या कामगारांनी स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करून आपल्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ११५९ श्रमिकांनी भरलेली श्रमिक स्पेशल रात्री १० वाजता लखनौकडे रवाना झाली.कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कामगार, कष्टकरी कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन नागपुरात अडकलेल्या स्थानिक कामगारांसाठी श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गडचिरोली १४०, चंद्रपूर १८९, आणि उर्वरित नागपूर ग्रामीण मधील कामगारांनी आपल्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर ते लखनौ श्रमिक स्पेशल रेल्वेगाडी चालविण्याचा निर्णय घेतला. ही गाडी सायंकाळी ६ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर लागली. दरम्यान जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागपूर रेल्वेस्थानकावर भेट देऊन सर्व कामगारांची व्यवस्था होत आहे की नाही याची पाहणी केली. कामगारांसाठी राज्य शासनाने भोजन, पाण्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर विविध गावावरून बसेसने कामगार येणे सुरू झाले. रात्री १० वाजता ही गाडी रवाना झाली.
नागपुरातून ११५९ कामगार गेलेत आपल्या गावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 22:55 IST
नागपूर जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांसाठी जिल्हा प्रशासनाने श्रमिक स्पेशल रेल्वेगाडीची व्यवस्था केली. जागोजागी अडकलेल्या कामगारांनी स्थानिक प्रशासनाकडे नोंदणी करून आपल्या गावी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ११५९ श्रमिकांनी भरलेली श्रमिक स्पेशल रात्री १० वाजता लखनौकडे रवाना झाली.
नागपुरातून ११५९ कामगार गेलेत आपल्या गावी
ठळक मुद्देनागपूर-लखनौ एक्स्प्रेसने रवाना : रेल्वेस्थानकावर केली भोजनाची व्यवस्था