- नरेश डोंगरे, नागपूरतिचे वय वर्षे ११, तिला ना लिहिता बोलता येत होते, ना व्यवस्थित काही सांगता येत होते. अशा स्थितीत ती रेल्वे स्थानकावरून थेट बिहारला जाण्यासाठी निघाली होती. मात्र, प्रवासात तिच्यासोबत काहीही अघटित होण्याचा धोका लक्षात घेऊन तिला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पथकाने मदतीचा हात दिला अन् तिची शासकीय बालिका सुधार गृहात रवानगी केली. घटना आज सकाळी ११ वाजताची आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर ड्युटीवर असलेल्या महिला प्रधान आरक्षक स्नेहल यांना संबंधित मुलगी बक्सरला जाणाऱ्या ट्रेनबाबत चौकशी करताना दिसली. तिच्यासोबत पालक किंवा नातेवाईक दुसरे कुणीही नसल्याचे लक्षात येताच आरपीएफ कर्मचाऱ्यांनी तिची चौकशी केली.
यावेळी मुलीने सांगितले की, ती ७ एप्रिल रोजी आपल्या बहिणीसोबत नागपुरात आली होती. मात्र, बहिणीने तिला परत जाण्यासाठी पैसे देऊन एकटेच पाठवले. त्यानुसार ती बसने नागपूर स्थानकावर पोहोचली होती.
घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. मुलगी अल्पवयीन आणि एकटी असल्याने तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला कर्मचाऱ्यांनी तिला आरपीएफ ठाणे, नागपूर येथे आणले. उपनिरीक्षक पूजा सूर्यवंशी यांनी चाइल्ड लाइन प्रतिनिधी नितेश सांगोडे यांच्या उपस्थितीत तिची सविस्तर चौकशी केली.
चौकशीत मुलीने आपले नाव नंदनी (वय ११ वर्षे आणि पत्ता कोरानसराय, जिल्हा बक्सर, बिहार) असे सांगितले. मात्र, तिला पालकांचा मोबाईल क्रमांक किंवा बहिणीचा पत्ता याबाबत कोणतीही माहिती देता आली नाही.
बक्सरला एकटेच जाण्याचा बालहट्ट
बक्सरला एकटेच जाण्याचा बालहट्ट धरणाऱ्या या बालिकेसोबत प्रवासादरम्यान काहीही होऊ शकते, हा धोका ध्यानात घेऊन उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी आरक्षक उषा उइके यांच्या मदतीने शासकीय वाहनातून शासकीय बालिका सुधारगृह, काटोल नाका येथे सुरक्षितपणे दाखल करण्यात आले. तिच्या पालकांशी संपर्क केल्यानंतर तिला तिच्या कुटुंबात परत पाठविले जाणार आहे.
Web Summary : In Nagpur, an 11-year-old girl traveling alone to Bihar was rescued by RPF. Unable to communicate effectively, she was found at the railway station. Authorities placed her in a shelter home, planning reunification with her family.
Web Summary : नागपुर में, 11 वर्षीय एक लड़की को बिहार अकेले यात्रा करते समय आरपीएफ ने बचाया। प्रभावी ढंग से संवाद करने में असमर्थ, वह रेलवे स्टेशन पर मिली। अधिकारियों ने उसे आश्रय गृह में रखा, और उसके परिवार के साथ पुनर्मिलन की योजना बना रहे हैं।