शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

११ लाखांच्या चोरीचे प्रकरण : हॉटेलचा कर्मचारीच निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 22:45 IST

व्यवसायानिमित्त नागपुरात आलेल्या आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या पुणे येथील एका उद्योजकाच्या बॅगेतून तब्बल ११ लाख रुपये चोरीला गेली. २६ दिवसानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून तहसील पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्यास अटक केली आहे. शिवाजी गणपत बुचडे (३८) रा. विरोली, पारनेर, जि. अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९ लाख १० हजार रुपये जप्त केले आहे.

ठळक मुद्देपुणे येथील उद्योजकाची रक्कम : तहसील पोलिसांचे यश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : व्यवसायानिमित्त नागपुरात आलेल्या आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या पुणे येथील एका उद्योजकाच्या बॅगेतून तब्बल ११ लाख रुपये चोरीला गेली. २६ दिवसानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून तहसील पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्यास अटक केली आहे. शिवाजी गणपत बुचडे (३८) रा. विरोली, पारनेर, जि. अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९ लाख १० हजार रुपये जप्त केले आहे.सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे येथील उद्योजक सतीश जेवरचंद सेठीया (५८) व्यवसायानिमित्त नागपुरात आले होते. ते तीन-चार महिन्यांपासून सेंट्रल एव्हेन्यू गांधीबाग येथील इंडिया सन हॉटेलमधील खोली क्रमांक ४०५ मध्ये थांबले होते. गेल्या ३ मे रोजी त्यांनी व्यवसायाचे रात्री ९ वाजता रोख ११ लाख रुपये आपल्या प्रवासी बॅगेत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते कामानिमित्त बोहर निघून गेले. रात्री परत आले. ५ तारखेला पहाटे त्यांनी आपली बॅग उघडून पाहिली तेव्हा बॅगमध्ये पैसे नव्हते. कुणीतरी अज्ञात चोरट्याने ती रक्कम लंपास केली होती. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक रामदास पाटील, अमित बकतवार, किशोर महंत, अनिल चतुर्वेदी, रवींद्र पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. अखेर २७ दिवसानंतर आरोपीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले. या दरम्यान आरोपी शिर्डीला गेला होता. परंतु तो आपल्या घरी न जाता नागपूरला परत आला. नागपुरात वेगवेगळ्या लॉजमध्ये राहू लागला. शेवटी पोलिसांना त्याला मोठा ताजबाग परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरतांना पकडले. त्याच्या जवळच्या बॅगची झडती घेतली असता त्यात ९ लाख १० हजार रुपये रोख सापडले. विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. या पैशातून त्याने एक बॅग व मोबाईल खरेदी केला होता. तसेच हॉटेल व लॉजमध्येही थांबला होता. यादरम्यान त्याने बराच पैसा खर्च केला.दुचाकी व मोबाईल चोरांना अटकतहसील पोलिसांनी दुचाकी व मोबाईल चोरोसही अटक केली. अर्पण राहुल पाटील रा. गोजी जि. वर्धा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून आतापर्यंत चार दुचाकी वाहनासह १ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच जरीपटका येथील शेख इमरान शेख सलीम आणि टीमकी येथील भूषण जगदीश पारडे या मोबाईल चोरासही अटक केली. त्यांच्याजवळून ४ मोबाईल फोनसह २५ हजार ४९० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

टॅग्स :hotelहॉटेलtheftचोरीArrestअटक