शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०९ बॉटल जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 23:17 IST

नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत ठेवलेल्या पोत्यात पथकाला २८३४ रुपये किमतीच्या १०९ दारूच्या बॉटल्स आढळल्या आहेत.

ठळक मुद्देदिवाळीच्या दिवशी दारूची तस्करी : रेल्वे सुरक्षा दलाची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या दिवशीही दारूची विक्री करणारे आरोपी सक्रिय असल्याची बाब रेल्वे सुरक्षा दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत स्पष्ट झाली आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस अवस्थेत ठेवलेल्या पोत्यात पथकाला २८३४ रुपये किमतीच्या १०९ दारूच्या बॉटल्स आढळल्या आहेत.चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. त्यामुळे रेल्वेमार्गाने या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होते. निवडणुकीच्या काळात रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असल्यामुळे दारूची तस्करी करणारे आरोपी भूमिगत झाले होते. परंतु निवडणूक आटोपताच पुन्हा दारूची तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत. रेल्वेगाड्यात दारूची तस्करी करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने विशेष पथक तयार केले आहे. रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, रामनिवास यादव यांच्या नेतृत्वात शशिकांत गजभिये, बसंतसिंह परिहार, बी. बी. यादव, अश्विनी मुळतकर, निता माझी, सुषमा ढोमणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक जी. एन. केंद्रे, चंदु गोबाडे हे रविवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावर गस्त घालत होते. पथकाला प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक बॅग बेवारस अवस्थेत आढळली. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या २८३४ रुपये किमतीच्या १०९ बॉटल होत्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरliquor banदारूबंदी