शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

विदर्भ पर्यटनासाठी १०६ कोटी मंजूर; मिळाले २१.२५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:35 IST

विदर्भातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मागील दोन वर्षात १०६.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २१.२१ लाखांचाच निधी प्राप्त झाल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देकसा होणार पर्यटन विकास: विधान परिषदेत प्रकाश गजभिये यांचा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी येथील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाला मागील दोन वर्षात १०६.३६ कोटींचा निधी मंजूर केला आहे. यातील २१.२१ लाखांचाच निधी प्राप्त झाल्याची माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. सदस्य प्रकाश गजभिये यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पूर्व व पश्चिम विदर्भ यानुसार कार्यक्षेत्र आहे. नागपूर प्रादेशिक विभाग व अमरावती प्रादेशिक विभाग अशी कार्यक्षेत्र आहेत. मागील दोन वर्षात पूर्व विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या जिल्ह्यासाठी शासनाने ६३.९६ कोटींचा निधी मंजूर केला होता. प्रत्यक्षात १५.९५ कोटींचा निधी प्राप्त झाला. अमरावती विभागातील जिल्ह्यासाठी ४२.४० कोटींचा निधी मंजूर आहे. प्रत्यक्षात ५.३० कोटींचा निधी प्राप्त झाल्याची माहिती रावल यांनी लेखी उत्तरात दिली.मंजूर असल्याप्रमाणे निधी उपलब्ध होत नाही. अशा परिस्थितीत विदर्भाचा पर्यटन विकास कसा होईल, असा प्रश्न गजभिये यांनी उपस्थित केला आहे.सिंचन प्रकल्पासाठी ७४९२ कोटींची तरतूदराज्यात सद्यस्थितीत ६४ मोठे , ७९ मध्यम व १९१ लघु असे एकूण ३३४ सिंचन प्रकल्प बांधकामाधीन असून या प्रकल्पांसाठी सन २०१८-१९ या वर्षासाठी ७४९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत राज्यातील २६ प्रकल्प समाविष्ट करण्यात आलेले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी प्राप्त होतो. तसेच नाबार्डकडूनही या प्रकल्पांना अर्थसाहाय्य प्राप्त करून घेण्यात येत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील १४ आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील तसेच उर्वरित महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त प्रकल्पांसाठी विशेष पॅकेजला केंद्राची मान्यता अंतिम टप्प्यात असल्याची माहिती महाजन यांनी लेखी उत्तरात दिली. अमरिशभाई पटेल यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८tourismपर्यटन