शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
2
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
3
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
4
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
5
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
6
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
7
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये फक्त ४९ दिवसच विवाह मुहूर्त; खरोखरंच करावी लागणार लगीन 'घाई'
8
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
9
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
10
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
11
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
12
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
13
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
14
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
15
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
16
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
17
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
18
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
19
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
20
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास

१०४ योजनेलाच ‘रक्ता’ची गरज; रोज फक्त दोन ते तीन पिशव्यांचाच पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 11:34 IST

तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही.

ठळक मुद्देअद्ययावत उपकरणाचा अभाव, रक्ताचा तुटवडा

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तातडीने रक्त हवंय...तर ‘१०४ या टोल फ्री’ क्रमांकावर फोन करा, अन वाजवी दरात रक्त मिळवा...अशा घोषणा करीत २०१४ मध्ये महत्त्वाकांक्षी योजना सुरू झाली. परंतु पाच वर्षांचा कालावधी होऊनही दिवसाकाठी दोन किंवा तीन रक्त पिशव्यांसमोर ही योजना गेली नाही. विशेष म्हणजे, शहरात रोज साधारण एक हजार रक्तपिशव्यांची मागणी असताना, २०१७ या वर्षात ५३९, २०१८ मध्ये ४५८ तर २०१९ मार्चपर्यंत केवळ १२८ रक्त पिशव्यांचा पुरवठा झाला आहे. रक्ताचा तुटवडा व अद्ययावत उपकरणांच्या अभावामुळे या योजनेलाच ‘रक्ता’ची गरज असल्याचे चित्र आहे.महराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना ‘१०४-ब्लड आॅन कॉल’ राज्यात ७ जानेवारी २०१४ सुरू करण्यात आली. गरजू रुग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. गरजू व्यक्तीने या क्रमांकावर दूरध्वनी केल्यावर पुण्यातील केंद्रावर फोन जातो, तेथून संबंधित व्यक्तीच्या ठिकाणावरील १०४ क्रमांकाशी तो जोडला जातो, किंवा संबंधिताच्या मोबाईलवर फोन येतो. यात ४० किमी किंवा एक तासाच्या अंतरावरील रुग्णालयांना शीतसाखळीतून रक्त उपलब्ध करून दिले जाते. परंतु या क्रमांकाची जनजागृती होऊनही या क्रमाकांकडून रक्ताची फार कमी मागणी होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे या योजनेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे झाल्याचे बोलले जात आहे.

प्लाज्मा, प्लेटलेटचा अभावडागा रुग्णालयाच्या रक्तपेढीतून सुरू असलेल्या या योजनेकडे शासनाचे सुरुवातीपासूनच दुर्लक्ष झाले. योजना सुरू होऊन पाच वर्षे झाले असताना रक्तपेढीसाठी आवश्यक असलेले ‘कम्पोनंट सेप्रेटर’ सारखे आवश्यक उपकरण उपलब्ध झाले नाही. यामुळे रुग्णांना केवळ होल ब्लड (संपूर्ण रक्त) दिले जाते. रुग्णांना गरज असलेली प्लाज्मा, प्लेटलेट मिळत नाही. यामुळे योजनेला नव्या संजीवनीची गरज आहे.

रक्ताचा तुटवडाहीसुरुवातीला म्हणजे २०१६ मध्ये ‘१०४-ब्लड आॅन कॉल’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु पुढे या योजनेतून गरजू व्यक्तींना हवे त्या वेळी व हव्या त्या रक्त गटाचा पुरवठ्याला केंद्राकडून प्रतिसाद मिळणे कमी झाले. यातच या रक्तपेढीला डागा रुग्णालयातील रुग्णांना व कामठी रुग्णालयातील ‘ब्लड स्टोरेज’ला रक्त पुरवठा करावा लागतो. यामुळे ‘ब्लड आॅन कॉल’साठी फार कमी रक्त पिशव्या उपलब्ध राहत असल्याने याचा फटकाही योजनेला बसत आहे.स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणारे कमी४‘१०४’ योजनेत स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणाऱ्या दात्यांची संख्या अत्यल्प आहे. शिवाय, मनुष्यबळ नसल्याने बाहेर रक्तदान शिबिर घेणे या रक्तपेढीला अडचणीचे जाते. यामुळे या क्रमांकावर फोन केल्यावर रक्त मिळत नाही, अशी लोकांची ओरड आहे.

रक्त पिशव्यांच्या मागणीत घटउपराजधानीत रोज हजार रक्त पिशव्यांची गरज पडते. त्यानुसार ‘१०४- ब्लड आॅन कॉल’ला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते. परंतु सोर्इंच्या अभावी ही योजना बारगळत असल्याचे चित्र आहे. २०१४ मध्ये ३१३, २०१५ मध्ये ५०५, २०१६ मध्ये ७०९, २०१७ मध्ये ५३९, २०१८ मध्ये ४५८ तर २०१९ मार्चपर्यंत केवळ १२८ रक्त पिशव्यांचा गरजू रुग्णांना पुरवठा झाला आहे.

टॅग्स :Blood Bankरक्तपेढी