शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वे स्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:00 IST

लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : एका आरोपीला अटक

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : लोकसभा निवडणुकीत जारी करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आरपीएफच्या महासंचालकांनी दिलेल्या निर्देशानुसार तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या १०४ बॉटल्स जप्त केल्या. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांड्येय यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य उपनिरीक्षक बी. एस. बघेल, विकास शर्मा, अर्जुन पाटोले हे सोमवारी दुपारी १.३० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. त्यांना प्लॅटफार्मवर उभ्या असलेल्या १२६१६ जीटी एक्स्प्रेसच्या एस ४ कोचमध्ये एक बॅग संशयास्पद स्थितीत आढळली. आजूबाजूच्या प्रवाशांना विचारणा केली असता बॅगवर कुणीच आपला हक्क सांगितला नाही. संशयाच्या आधारे बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १६२० रुपये किमतीच्या १४ बॉटल्स आढळल्या. दुसऱ्या घटनेत सायंकाळी ५.४० वाजता आरपीएफ जवान विकास शर्मा, शेख शकील, धर्मदेव कुमार, बी. बी. यादव यांना प्लॅटफार्म क्रमांक २ वर उभ्या असलेल्या १२७२२ दक्षिण एक्स्प्रेसच्या एस ९ कोचमध्ये एक व्यक्ती बॅग घेऊन संशयास्पद स्थितीत आढळली. त्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यास आरपीएफ ठाण्यात आणून उपनिरीक्षक आर. आर. काळे यांच्यासमोर हजर केले. त्याने आपले नाव मधूर राजेंद्र ब्राम्हणे (१८) रा. पठाणपुरा वॉर्ड, चंद्रपूर सांगितले. त्याच्याजवळील बॅगमध्ये दारूच्या २३४० रुपये किमतीच्या ९० बॉटल्स आढळल्या. निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार सहायक उपनिरीक्षक बी. एस. बघेल, आर. आर. काळे यांनी जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केली.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदी