शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
2
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
3
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
4
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
5
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
6
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
7
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
8
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
9
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
10
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
11
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
12
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
13
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
14
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
16
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
17
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
18
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
19
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
20
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब

दुकानासमोर गर्दी वाढवाल तर १० हजार दंड; नागपुरात आयुक्तांचे  आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:34 IST

Nagpur News नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करून  ५ ते १० हजार रुपये दंड, गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी दिले.

ठळक मुद्देगर्दी नियंत्रणासाठी पोलीसमार्केटमधील गर्दीने प्रशासनाचे वाढवले टेन्शन

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  :   दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी वाढली आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. यामुळे प्रशासनाचा ताप वाढला आहे. शासन दिशानिर्देशाचे पालन व्हावे, यासाठी आराखडा तयार करून अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.  नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर सक्तीने कारवाई करून  ५ ते १० हजार रुपये दंड, गर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त लावण्याचे निर्देश महापालिका आयुक्त  राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी  मनपा मुख्यालयात  मनपा आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले.

दिवाळी खरेदीसाठी सीताबर्डी,  गांधीबाग,  इतवारी, महाल, गोकुळपेठ, जरीपटका आणि इतर बाजारपेठेत नागरिकांची  होणारी  गर्दी  ही  कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरू शकते. शहारातील बाजारांमध्ये गर्दी होऊ नये यासाठी नागपुरातील काही बाजारपेठांना ‘व्हेईकल फ्री झोन’ करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी मनपा, वाहतूक पोलीस गर्दीवर नियंत्रण आणण्यासंदर्भात  समन्वयाने कार्य करणार आहेत.  सीताबर्डी शॉप असोसिएशनचे प्रतिनिधी तसेच हॉकर्सच्या प्रतिनिधींनासुद्धा सामाजिक अंतर ठेवणे,  मास्कचा आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांनी नियमांचे पालन  न केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठकीत पोलीस उपायुक्त (वाहतूक) सारंग आवाड, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन, मिलिंद मेश्राम, महेश मोरोणे, प्रकाश वराडे, संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ. प्रदीप दासरवार, सहायक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमणे, बर्डीचे पोलीस निरीक्षक अतुल सबनीस आदी उपस्थित होते.

स्वत:ची काळजी घ्यामास्क घातल्याशिवाय कुणालाही दुकानात येऊ देऊ नये, कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्या, दुकानात क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश देऊ नये, शारीरिक अंतर राखले जाईल याची काळजी घ्या. कोरोनाच्या या संकटात आपणाला नियमांचे पालन करून एकत्रित लढा द्यायचा आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घ्या, असे आवाहन आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

गर्दी नियंत्रणाची जबाबदारी सहायक आयुक्तांवर बाजारातील गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपाच्या  सहायक आयुक्तांवर सोपविली आहे. यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणे तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

यांना आहेत कारवाईचे अधिकार आदेशाची अंमलबजावणी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी मनपाचे उपद्रव शोध व निर्मूलन पथकातील कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता अधिकारी व संबंधित झोनचे सहायक आयुक्त तथा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे महानगरपालिकेचे सर्व संबंधित अधिकारी, सर्व संबंधित पोलीस उपनिरीक्षक व त्यापेक्षा वरिष्ठ दर्जाचे पोलीस अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस