शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती, ‘ओजस’ देणार सीबीएसईला टक्कर ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 22:31 IST

जि.प आणि महापालिका शाळा म्हटलं की आज सामान्य पालकही नाक मुरडतो! या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर कधी देतील? असे लाखदा विचारलं जातं. पण या शाळा आजही आहे तिथेच आहेत. मात्र नव्या वर्षात या शाळा ग्लोबल भरारी घेणार आहेत.

ठळक मुद्देमनपा, जि.प.च्या शाळा होणार ग्लोबलनागपूर विभागात २० आंतरराष्ट्रीय शाळा

आॅनलाईन लोकमतनागपूर : जि.प आणि महापालिका शाळा म्हटलं की आज सामान्य पालकही नाक मुरडतो! या शाळा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर कधी देतील? असे लाखदा विचारलं जातं. पण या शाळा आजही आहे तिथेच आहेत. मात्र नव्या वर्षात या शाळा ग्लोबल भरारी घेणार आहेत.महापालिका, जिल्हा परिषद, आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्यात १०० आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील २० शाळा नागपूर विभागात स्थापन करण्यात येतील.आंतरराष्ट्रीय शाळानिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात १० ‘ओजस’ शाळा स्थापन करतील. या शाळा यानंतर ९० ‘तेजस’ शाळांची निर्मिती करतील. ओजसच्या निर्मितीला महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षाकडून तांत्रिक मार्गदर्शन मिळेल. एक ओजस शाळा नऊ ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांची निर्मिती करेल.‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांसाठी महापालिका क्षेत्रातून प्रत्येकी एक व ग्रामीण भागातील किमान दोन शाळा निवडण्यात येतील. आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येकी दोन ‘तेजस’ आंतरराष्ट्रीय शाळांसाठी निवडण्यात येतील. नोव्हेंबर २०१७ ते मार्च २०२२ पर्यंतच्या कालावधीत या शाळांची निर्मिती होईल.काय आहे ओजस आणि तेजस सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाच्या शाळांना टक्कर देण्यासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी ‘ओजस’ आणि ‘तेजस’ शाळांची निर्मिती केली जाईल. सुरुवातीला राज्यात १० ओजस शाळांची निर्मिती होईल. यानंतर एक ‘ओजस’ शाळा नऊ ‘तेजस’ शाळांची निर्मिती करेल. यासाठी ते स्वत:चे मॉडेल या शाळांपुढे ठेवेल. या शाळेचे शिक्षक, मुख्याध्यापक कोण असतील. कोणत्या शाळा या प्रकल्पासाठी निवडल्या जाव्यात, यासाठी जिल्हास्तरावर समिती असेल. या प्रकल्पासाठी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या  ‘मला चॅलेंज हवे’ या लिंकवर अर्ज करणाऱ्या  शिक्षक आणि मुख्याध्यापकांना या कार्यशाळेसाठी आमंत्रित करण्यात येईल. यानंतर ‘ओजस’ आणि ‘तेजस’साठी शिक्षकांची निवड करण्यात येईल.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSchoolशाळा