शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

१०० कोटींचा व्यवहार ठप्प

By admin | Updated: December 6, 2014 02:31 IST

पगारवाढीसह विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला होता. सुमारे १०० कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित झाला.

नागपूर : पगारवाढीसह विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय संप पुकारला होता. सुमारे १०० कोटी रुपयांचा व्यवहार प्रभावित झाला. युनायटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या (यूएफबीयू)आवाहनावर पश्चिम झोनमधील बँकेने हा संप केला होता. वेतनवाढीच्या प्रश्नावर गेल्या महिन्यात देशव्यापी संप केल्यानंतरही तोडगा न निघाल्याने बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मंगळवारपासून विभागीय संप पुकारला. या संपाच्या जाहीर वेळापत्रकानुसार शुक्रवारी महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि दीव-दमण येथील बँक कर्मचारी यांनी एक दिवसाचा संप केला. आज संपादरम्यान किंग्जवेस्थित स्टेट बँकआॅफ इंडिया कार्यालयाच्या समोरून रॅली निघाली. यावेळी पुरुषांसोबतच महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. हातात झेंडे, बॅनर, पोस्टर आदी घेऊन आंदोलनकर्ते सिव्हिल लाईन्स येथील अलाहाबाद बँक परिसरात पोहोचले. येथे रॅलीचे रूपांतर सभेत झाले.बँक कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पाशर््वभूमीवर इंडियन बँक्स असोसिएशनच्या (आयबीए) निवेदनानुसार बँक कर्मचाऱ्यांची २५ टक्क्यांची पगारवाढीची मागणी मान्य करता येणार नसल्याचे नमूद केले आहे. पगारवाढ ही मूळ पगार आणि कार्यक्षमतेवर आधारित अशा दोन गटांत विभागून देण्याचा प्रस्ताव आयबीएने ठेवला होता, मात्र संघटनांनी हा प्रस्ताव अमान्य केला. बँकांचा नक्त नफा कमी झाला असून, कर्मचारीवर्ग व त्यांचा महागाई भत्ताही वाढलेला आहे. त्यामुळे बँकांना कर्मचाऱ्यांना अपेक्षित असलेली पगारवाढ देता येणार नाही, असे आयबीएने जाहीर केले आहे. यावर या जाहीर सभेत उपस्थित विविध युनियनच्या मान्यवरांनी आपले विचार मांडले. यूएफबीयूचे विदर्भ समन्वयक बी.के. तलवारे यांनी सांगितले की, मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांत अनिश्चितकालीन संप पुकारण्यात येईल. यावेळी यूएफबीयूशी जुडलेले एआयबीओसी, एआयबीईए, एनसीबीई, एआयबीओसी, बीईएफआय, आयएनबीईएफ, आयएनबीओसी, एनडीबीडब्ल्यू व एनडीबीडी संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी सहभागी होते. (प्रतिनिधी)