शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर कंत्राटदारांची मनपाकडे १०० कोटींची बिले प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 00:32 IST

स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. यात महापालिकेचाही वाटा आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे महापालिकेतील कंत्राटदाराची जवळपास १०० कोटींचे बिल प्रलंबित आहे. यात प्रामुख्याने शासन निधीच्या कामांचा समावेश आहे.

ठळक मुद्देमनपाच्या विकास कामांची गती मंदावलीअर्थसंकल्पानंतर बिल मिळण्याची आशा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: स्मार्ट सिटी करण्यासाठी उपराजधानीत विकासाची विविध कामे सुरू आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. यात महापालिकेचाही वाटा आहे. परंतु आर्थिक अडचणीमुळे महापालिकेतील कंत्राटदाराची जवळपास १०० कोटींचे बिल प्रलंबित आहे. यात प्रामुख्याने शासन निधीच्या कामांचा समावेश आहे.मार्चपूर्वी शासनाकडून विविध विकास कामे व योजनांचा अपेक्षित निधी प्राप्त झाला. मात्र आर्थिक अडचणीमुळे हा निधी दुसऱ्या कामासाठी वापरण्यात आला. त्यामुळे गेल्या मार्चपासून कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. महापालिकेचा २०१८-१९ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केल्यानतंरच प्रलंबित बिल मिळण्याची शक्यता महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाईल. त्यानंतर उपलब्ध निधी व प्राधान्यक्रम विचारात घेऊन निधी उपलब्ध केला जाईल. यात प्रलंबित बिल मिळण्याची कंत्राटदारांना आशा आहे.दरवर्षी दिवाळी व होळीला महापालिकेच्या कंत्राटदारांना बिलाची रक्कम मिळत होती. परंतु गेल्या वर्षात बिल मिळाले नव्हते. त्यातच नवीन सीएसआरमुळे अडचणीत भर पडल्याने कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारले होते. यामुळे काही दिवस शहरातील विकास कामे ठप्प होती. जानेवारी- फे ब्रुवारी महिन्यात बिलाची काही रक्कम मिळाली तर राज्य शासनाकडून अनुदान मिळताच कंत्राटारांची संपूर्ण थकबाकी दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु राज्य सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानतंरही बिल मिळालेले नाही. वित्त विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. याचा फटका कंत्राटदारांना सहन करावा असल्याचे कंत्राटदारांनी सांगितले.मूलभूत सुविधावर परिणामशहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. यात अंतर्गत रस्ते, पथदिवे, गडरलाईन, त्यावरील झाकणे, प्रभागातील रस्त्यांचे डांबरीकरण अशी हजारो कामे संथ आहेत. याचा मूलभूत सुविधावर परिणाम झाला आहे. गडरलाईची कामे तातडीने करावयाची असतात. परंतु ही कामे रखडल्याने नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.१०० कोटींचे बिल थकीतराज्याकडून प्राप्त झालेला निधी अन्य कामावर खर्च करण्यात आला. त्यामुळे मार्च महिन्यापासून कंत्राटदारांना बिल मिळालेले नाही. यासंदर्भात पदाधिकारी व अधिकाºयांशी चर्चा केली. आश्वासन मिळाले. परंतु अद्याप बिल मिळालेले नाही. थकीत बिलाची रक्कम १०० कोटीच्या आसपास आहे.विजय नायडू , अध्यक्ष महापालिका कंत्राटदार असोसिएशन

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर