शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  १०० कोटींचे बनावट बिल रॅकेट उजेडात : तीन संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 00:52 IST

डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी करदात्यांचे बिझनेस कार्यालय आणि निवासांची तपासणी केली. या कारवाईत छुप्या डिजिटल डेटासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली. १०० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या या व्यवहारात ७ फेब्रुवारीला तीन संचालकांना अटक केली.

ठळक मुद्दे डीजीजीआयची कारवाई

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : बनावट इनव्हाईस जारी करणे आणि फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटच्या उपलब्धतेसंदर्भात प्राप्त माहितीच्या आधारे, डीजीजीआय, नागपूर विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांनी ५ आणि ६ फेब्रुवारीला शोधमोहीम राबविली. या मोहिमेत बनावट इनव्हाईस रॅकेटमध्ये सहभागी करदात्यांचे बिझनेस कार्यालय आणि निवासांची तपासणी केली. या कारवाईत छुप्या डिजिटल डेटासह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कागदपत्रे जप्त करण्यात आली. १०० कोटींपेक्षा जास्त मूल्याच्या या व्यवहारात ७ फेब्रुवारीला तीन संचालकांना अटक केली.करदात्यांनी १०८ कोटींपेक्षा जास्त मूल्याचे बनावट इनव्हाईस मिळविले व जारी केले आणि ९.७५ कोटी रुपयांच्या फसव्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा लाभ घेतला. बनावट पावत्या प्राप्त केल्याचे आणि दिल्याचे व्यावसायिकांनी मान्य केले तसेच बनावट पावत्या प्राप्त करण्यासाठी बऱ्याच प्रोप्रायटरशिप फर्म स्थापन केल्याचे तथ्यही मान्य केले. याचा उपयोग करून कोट्यवधी रुपयांचे बनावट इनव्हाईस आणि फसवे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळविले.अधिकाऱ्यांनी बाबा इन्टरप्राईजेसचे रामप्रसाद गंभीराजी बोरकर, भवानी इन्टरप्राईजेसचे मो. शमशाद शेख आणि करण स्टीलचे नेहर घनश्याम बोपचे यांना अटक केली. बनावट इनव्हाईस रॅकेटमध्ये सामील झालेले मूळ सूत्रधार आणि इतर घटकांचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.यांच्यावर झाली कारवाई 

  •  बाबा इन्टरप्राइजेस : रामप्रसाद गंभीराजी बोरकर, २७, मारोती सोसायटी, भरतवाडा रोड, भरतनगर. (४ कोटी, ६६ लाख ९८ हजार ७१० रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.)
  •  भवानी इन्टरप्राइजेस : मोहम्मद शमशाद शेख, युनिट मार्बल, गंगाबाई घाट रोड, भांडेवाडी, नागपूर. (२ कोटी ४७ लाख ४७ हजार ७६९ रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले. )
  •  करण स्टील : नेहर घनश्याम बोपचे, ८, भवानीनगर, पुनापूर रोड, पारडी (२ कोटी, १९ लाख, ३२ हजार ५६० रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.)
  •  कुश ट्रेडर्स : राम कैलाशचंद्र जांगीड, फ्लॅट ९, सुखानी कॉम्प्लेक्स, छापरूनगर चौक, लकडगंज (४१ लाख ६८ हजार ९६९ रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतले.)
  •  साईकृपा इन्टरप्राइजेस : हर्षल बंडू रामटेके, शॉप ६, श्रीराम कुंज, कच्छी विसा भवनाजवळ.

एकूण बनावट बिलाचा स्वीकार : ५४ कोटी १९ लाख ३३ हजार ३७८ रुपये.एकूण बनावट बिल जारी केले : ५४ कोटी १९ लाख ३३ हजार ३७८ रुपये.

टॅग्स :businessव्यवसायfraudधोकेबाजीraidधाडArrestअटक